property tax Sakal
पुणे

Property Survey : सवलत न मिळालेल्या मिळकतीचे सर्वेक्षण

मिळकतकराची ४० टक्के सवलत अद्याप १ लाख ९३ हजार पुणेकरांनी घेतलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मिळकतकराची ४० टक्के सवलत अद्याप १ लाख ९३ हजार पुणेकरांनी घेतलेली नाही. त्यामुळे अशा मिळकतीचे सर्वेक्षण करून नेमकी काय अडचण आली आहे हे महापालिकेने शोधण्यास सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हिंगणे, वडगाव, धायरी भागात सर्वेक्षण झाले आहे.

राज्य सरकारने पुणेकरांना लागू असलेली १९७० पासूनची मिळकतकराची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवले आहेत अशा ९७ हजार मिळकतींचा समावेश करण्यात आला. त्यांना २०१९ ते २०२२ या तीन वर्गातली ४० टक्के सवलतीची रक्कम फरकासह भरण्याचे आदेश देण्यात आले.

याविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय रद्द केला. ज्या नागरिकांची सवलत गेलेली आहे, त्यांनी पीटी ३ अर्ज भरण्याची मुदत दिलेली होती. यामध्ये शहरातील सुमारे २ लाख ६४ हजार मिळकतींना ४० टक्के सवलत मिळावी यासाठी अर्ज करणे अपेक्षीत होते. पण अद्याप १ लाख ९३ हजार नागरिकांनी पीटी ३ अर्ज भरलेला नाही.

या मिळकतींचा अर्ज का भरले गेलेला नाही यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हिंगणे, वडगाव धायरी भागात १० हजार मिळकतीचे सर्वेक्षण केले जाणार असून, पहिल्या दिवशी ११०० मिळकतींची माहिती संकलित झाली आहे.

मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘वडगाव धायरी, हिंगणे भागातील ४० टक्क्यांची सवलत घेतली नाही अशा १ लाख ९३ हजार निवासी मिळकतीचे सर्वेक्षण केले जात आहे. ज्या मिळकतीमध्ये स्वतः मिळकतधारक राहत असले तर त्यांना पीटी ३ अर्ज देऊन माहिती संकलित केली जात आहे. आज पहिल्या दिवशी ११०० घरांची तपासणी केली. हे सर्वेक्षण प्रयोगिक तत्त्वावर केले जात असून, त्यानंतर पूर्ण शहरात केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT