Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
पुणे

सूस - महाळुंगेसाठी निधी कमी पडून देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

सूस आणि महाळुंगे या दोन्ही गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नसल्याचे' आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना दिले.

औंध - 'पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal) नव्याने समाविष्ट झालेल्या सूस (Sus) आणि महाळुंगे (Mahalunge) या दोन्ही गावांच्या विकास कामांकरिता निधी (Fund) कमी पडून देणार नसल्याचे' आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थितांना दिले. प्रलंबित असलेल्या स्मशानभूमी जवळील नाला चॅनेलींगचे भूमिपूजन व मुख्य रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी सूस येथे भेट दिली असता यावेळी ते बोलत होते.

पवार यांनी सूस येथे होत असलेल्या या कामाचे कौतुक करून येथील विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून आणणारे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नांमुळे येथे विकास कामे करणे शक्य झाल्याचेही ते म्हणाले. दिवसरात्र याठिकाणी उभे राहून स्वतः काम करून घेणारा लोकप्रतिनिधी तुमच्या आमच्या सारख्यांना मिळाल्यामुळे चांदेरे यांचे कौतुक करू तेवढे कमीच असल्याचेही पवार म्हणाले. संबंधित काम दर्जेदार व पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्याची सुचना पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी केली. या कामासाठी सहकार्य करून जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सूस येथील चांदेरे व ससार परिवाराचे पवार यांनी आभार मानले.

पुणे मनपात सूस व महाळुंगेचा समावेश झाल्यापासून मनपातर्फे गृहप्रकल्पांना टॅंकरने पाणी पुरवठा चालु करण्यात आला होता. परंतु, प्रशासनाने काही कालावधी नंतर हा पाणी पुरवठा बंद केला. याविषयी गृहप्रकल्पातील सर्व नागरिकांनी यावेळी अजित पवार यांना निवेदन देऊन टॅंकरने पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची विनंती केली. त्यावर लवकरात लवकर टॅंकरने पाणी पुरवठा चालु होईल तसेच कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून हि समस्या सोडवण्यात येईल'असे पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, ज्ञानेश्वर मोळक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, नामदेव चांदेरे, राजाभाऊ हगवणे, महादेव कोंढरे , मुळशी पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, गोवर्धन बांदल, चंद्रकांत काळभोर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, सुषमा निम्हण, डॉ.सागर बालवडकर, समीर चांदेरे, नितीन कळमकर, संजय ताम्हाणे, मनोज बालवडकर, पूनम विशाल विधाते, सुषमा ताम्हाणे, राखी श्रीराव तसेच सूस ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, गृहप्रकल्पातील नागरिक व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार यांनी सूस गावाला भेट दिल्याबद्दल सूस ग्रामस्थांनी पवार यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT