Water Tanker Sakal
पुणे

Water Tanker : सुस, म्हाळुंगेमधील सोसायट्यांचा टँकरवर ‘पाण्या’सारखा खर्च

सुसमधील एका सोसायटीला दररोज किमान पाच टॅंकर पाणी लागते, उन्हाळ्याची तीव्रता वाढते, तशी टॅंकरची संख्याही वाढत जाते.

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

सुसमधील एका सोसायटीला दररोज किमान पाच टॅंकर पाणी लागते, उन्हाळ्याची तीव्रता वाढते, तशी टॅंकरची संख्याही वाढत जाते.

पुणे - सुसमधील एका सोसायटीला दररोज किमान पाच टॅंकर पाणी लागते, उन्हाळ्याची तीव्रता वाढते, तशी टॅंकरची संख्याही वाढत जाते. महिन्याच्या शेवटी सोसायटीला पाणी आणि विजेसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. यावरून सध्या सोसायट्यांना पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेमुळे सूस-म्हाळुंगे परिसरातील सोसायट्यांची तहान भागण्याची किमान चिन्हे दिसू लागली आहेत, त्यासाठी पाण्याच्या पाच टाक्‍या बांधण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रियाही राबविली जाणार आहे. त्यामुळे सुस-म्हाळुंगेकरांना पाण्यासाठी आणखी अडीच वर्षे वणवण करावीच लागणार आहे.

सुस, म्हाळुंगे, बावधन यांसारख्या गावांमध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात सोसायट्या झाल्या. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) या सोसायट्यांना परवानग्या दिल्या. भविष्यात या सोसायट्यांना पिण्याचे पाणी, सांडपाणी वाहिन्या, मैलाशुद्धीकरण यांसारख्या आवश्‍यक गरजांबाबत मात्र पुरेसा विचार झाला नाही. परिणामी मागील काही वर्षांपासून या परिसरात नव्याने झालेल्या सोसायट्यांना पूर्णपणे बोअरवेल व टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्याने पाण्याचा प्रश्‍न तत्काळ सुटेल अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, अजूनही पाणी प्रश्‍न सुटण्याची चिन्हे नाहीत, तर दुसरीकडे महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुस, म्हाळुंगे येथे पाण्याच्या टाक्‍या उभारण्याच्या कामाला गती दिली आहे. सुसच्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ दोन, तर बालेवाडी येथे तीन अशा एकूण पाच टाक्‍यांचे काम केले जाणार आहे. आगामी दोन ते अडीच वर्षांत संबंधित काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. याविषयी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘सुस, म्हाळुंगेसाठीच्या पाण्याच्या कामासाठी ५२ कोटींची निविदा काढली आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जलवाहिन्या व पाण्याच्या टाक्‍यांचे काम पूर्ण केले जाईल.’’

पाणीपुरवठ्याची वैशिष्ट्ये...

  • पाणी पुरवठ्यासाठीची लोकसंख्या : किमान अडीच लाख

  • टाक्‍यांची एकूण संख्या : ५ (सूस २ व बालेवाडी ३)

  • पाण्याच्या टाक्‍यांची क्षमता : ४ एमएलडी, ३ एमएलडी व दीड एमएलडी

  • पाणीपुरवठा होणारे केंद्र : वारजे

  • जलवाहिन्यांची एकूण लांबी : ७५ ते ८० किलोमीटर

उन्हाळ्यात टॅँकरला मागणी जास्त

एका सोसायटीला पावसाळा, हिवाळ्यात दोन-तीन टॅंकर पाणी लागते, तेच उन्हाळा वाढल्यानंतर दररोज किमान पाच ते सहा टॅंकर पाणी लागते. प्रारंभी स्थानिकांकडून सोसायट्यांना आपल्याशी जोडून त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. दररोज हजारो टॅंकरची मागणी होत असल्याने एकीकडे टॅंकर व्यवसाय प्रोफेशनल पद्धतीने सुरू आहे, तर दुसरीकडे टॅंकर व्यावसायातील स्पर्धेचा फटका सोसायट्यांना बसत आहे.

महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेसाठी एकत्र निविदा प्रक्रिया राबविण्याचे सुचविले होते, मात्र तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी एकत्र निविदेऐवजी दोन-तीन गावांच्या पाण्यासंदर्भात निविदा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सूस, म्हाळुंगे व बावधन येथील पाण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली होती. पूर्वी २० दिवसांनी पाणी मिळत होते. आता गावठाणांमध्ये किमान दिवसाआड पाणी मिळत आहे. सोसायट्यांचा पाणी प्रश्‍न अद्याप कायम आहे.

- बाबूराव चांदेरे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

सोसायटीच्या एकूण खर्चापैकी दर महिन्याला ९० टक्के खर्च केवळ टॅंकरवरील पाणी आणि त्यासाठी लागणारी वीज यावर खर्च होत आहे. पावसाळा आणि हिवाळ्यातही टॅंकरने पाणी घेण्याशिवाय सोसायट्यांना पर्याय उरत नाही, तर उन्हाळ्यात दररोज किमान पाच टॅंकर लागतात. पाण्यासाठी लोकांना अक्षरशः पाण्यासारखा खर्च करण्याची वेळ आली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सोसायट्यांनाही नियमीत पाणीपुरवठा होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- अनुप नाईक, अध्यक्ष, एस थ्री प्राइम सोसायटी, सुसगाव

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुस-म्हाळुंगे येथे पाण्याच्या नवीन टाक्‍या उभारण्यात येणार आहेत. त्यासंबंधीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीकडे आले आहे, त्यास लवकरच मान्यता देण्यात येईल.

- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT