Sushil ganangl is trying to save environment by Cleaning
Sushil ganangl is trying to save environment by Cleaning 
पुणे

Video : पर्यावरणासाठी झटणारा स्वच्छतेचा पुजारी 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपळे सौदागर परिसरात तुम्ही जर मॉर्निंग वॉक करीत असाल, तर तुम्हाला बर्मुडा व टी-शर्ट घातलेला मध्यमवयीन तरुण तुमच्या नजरेस पडेल. तो कधी हातात गोणी घेऊन रस्त्यावरचे प्लॅस्टिक गोळा करीत असतो, तर कधी आपल्या दुचाकीवरून पाण्याच्या बादल्या वाहून नेत सुकलेल्या झाडांना पाणी घालत असतो. तर, कधी फुकट्या जाहिरातदारांनी विद्रूप केलेले बसथांबे स्वच्छ करताना तुम्हाला दिसेल, हा स्वच्छतेचा पुजारी आहे सुशील गंगल. 

पिंपळे सौदागरमधील दीपमाला सोसायटीत राहणारे सुशील यांनी पर्यावरणसंवर्धनाचा जणू वसाच घेतला आहे. दररोज सकाळी दोन तास तसेच शनिवारी, रविवारी सुटीच्या दिवशी चार-चार तास हा ध्येयवेडा स्वयंफूर्तीने श्रमदान करतो आहे. एक दिवस लिनियर गार्डनमध्ये स्वच्छता करतो, तर दुसऱ्या दिवशी पदपथांवर टाकलेल्या दारू, थंडपेयाच्या बाटल्या तसेच बिस्किटे, वेफर्सची पाकिटे तो गोळा करतो. ते सारे गोणीत भरून तो कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पी. के. चौक ते जर्वरी रस्ता, कोकणे चौक ते शिवार रस्त्यालगतच्या झाडांना तो पाणी देताना दिसतो. झाडांशेजारील तण तो खुरप्याने काढून लोखंडी पंज्याच्या साह्याने आळी करून झाडाची काळजी होतो. आत्तापर्यंत या परिसरातील सुमारे सत्तर देशी झाडांचे त्याने संगोपन केले आहे. 

पिंपरी महापालिका शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडल्या उंदराच्या लेंड्या 

सुशील म्हणाले, "पुढील चार-पाच वर्षे मी नोकरी करणार आहे. त्यानंतर कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणार आहे. मला पेंटिंगचा छंदही आहे. त्यामुळे टाकून दिलेले छोट्या जाहिरातींचे बोर्ड, डिश अँटिना, जुने माठ यावर पेंटिंग करून घर, सोसायटी मी सुशोभित करतो. यासाठी मला माझ्या सोसायटीतील पदाधिकारी व सभासदांचे सहकार्य मिळते.'' 

डेंग्यू, चिकुनगुनियासह या आजारांवर पुणे विद्यापीठाच्या संशोधकाने शोधले औषध

झाडांसाठी वाहून घेणारा दूत 
बनारस हिंदू विद्यापीठातून आयआयटी पास होऊन एमटेक केलेला हा तरुण पाच वर्षे अमेरिकेत न्यूयॉर्क येथे काम करीत होता. आजही ते पुण्यात एका नामांकित कंपनीत वर्षाला गलेलठ्ठ पगार घेत आहेत. परंतु, असे असतानाही पंचतारांकित जीवन जगण्याचे सोडून झाडांची काळजी लागल्याने हा माणूस बाहेरगावी जाणे टाळतो. पावसाळ्यात ते आठवडाभरासाठी बनारस येथील आपल्या गावी जातात. पण, तेथेही गंगामाईचा घाट स्वच्छ करून येतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT