Sushma Andhare sakal
पुणे

Sushma Andhare : फडणवीस ‘फेक नॅरेटिव्ह’चे केंद्र;सुषमा अंधारे यांची टीका,गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न

‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फेक नॅरेटिव्ह’चे चालते बोलते केंद्र आहेत,’’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फेक नॅरेटिव्ह’चे चालते बोलते केंद्र आहेत,’’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

अंधारे म्हणाल्या, ‘‘फडणवीस यांचे भाजप अधिवेशनातील भाषण फेक नॅरेटिव्हचे केंद्र किती मोठे असू शकते याचा धडधडीत पुरावा आहे. भाषणात फडणवीस म्हणाले, ‘ठाकरेंना आरक्षण टिकवता आले नाही.’ जर ठाकरेंना महाराष्ट्रात आरक्षण टिकवता आले नाही असे त्यांचे म्हणणे असेल; तर बिहारमध्ये भाजपचे डबल इंजिनचे सरकार होते; मग त्यांना तेथे आरक्षण का टिकवता आले नाही? महाराष्ट्रात भाजपला आरक्षण द्यायचे नसल्याने ते गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आरक्षणाची कालमर्यादा दहा वर्षांची ठेवली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आरक्षणाची मर्यादा दहा वर्षांनी वाढली,’ असेही फडणवीस म्हणाले. त्यावर अंधारे म्हणाल्या, ‘‘माझी अशी समजूत होती की फडणवीस फार हुशार आहेत, ते प्रचंड अभ्यास करतात. त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असते; पण ते निखालसपणे खोटं बोलत होते.’’

अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष, अशी टीका केली. त्यावर अंधारे म्हणाल्या, ‘‘ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, शहाबुद्दीन एन्काउंटर प्रकरण आहे, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. आम्ही कोण आहोत, काय आहोत? याचे प्रमाणपत्र गुजरातच्या तडीपाराकडून घेण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT