पुणे

कुरवली येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण

CD

उद्धट, ता ९ : कुरवली (ता. इंदापूर) येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण शुक्रवारी (ता.८) पार पडले. यावेळी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, मोहिमा व त्यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.
माती परीक्षणाच्या आधारे खतांचा संतुलित वापर, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर फळबागांचे संवर्धन, तसेच फळबाग लागवडीतील तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.
मंडळ कृषी अधिकारी जयकुमार मेटे व सहाय्यक कृषी अधिकारी शिवराज मचाले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणारी पिके निवडणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, सूक्ष्म सिंचन तसेच पाणी नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच पीक विमा व फळपीक विमा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना, महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
‘एल निनो’मुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम कृषी विभागाकडून प्रभावीपणे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Pune Crime : पुण्यात खळबळ! मैत्रीचा झाला रक्तरंजित शेवट; सिमेंटच्या दगडाने मित्राला संपवलं

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

Electric Vehicles Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दणक्याला 'इलेक्ट्रिक' उत्तर! ई-वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ; राज्यात नऊ लाख, तर जळगावात 23 हजार 'ईव्ही'

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

SCROLL FOR NEXT