कोथरूड - कै. जयाबाई सुतार दवाखान्याची इमारत. 
पुणे

सुतार दवाखान्यात सुविधांची वानवा

विनायक बेदरकर

कोथरूड - पश्‍चिम उपनगरातील नागरिकांना आधार असणाऱ्या कोथरूडमधील कै. जयाबाई सुतार दवाखान्यामध्ये निवासी डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या आवश्‍यकतेपेक्षा कमी आहे, तसेच येथे विविध सुविधांची वानवा असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पश्‍चिम उपनगरातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, भूगाव या परिसरातील ३०० ते ४०० रुग्ण सुतार दवाखान्यात उपचारासाठी येतात. मात्र, या ठिकाणी केवळ तीनच निवासी डॉक्‍टर उपलब्ध आहेत. यातील बालरोगतज्ज्ञ निवासी डॉक्‍टर हे पालिकेच्या सेवेत नसल्याने ते मोजक्‍या कालावधीसाठीच रुग्णालयात उपस्थित असतात, तर इतर दोन डॉक्‍टर ही पूर्ण वेळ रुग्णालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या रुग्णालयात प्रसूतीसाठी अनेक स्त्रिया येतात. मात्र प्रसूती वेळी सिझेरियन करण्याची वेळ आल्यास अशा रुग्णास शहरातील कमला नेहरू रुग्णालयात न्यावे लागते. या दोन्ही दवाखान्यातील अंतरामुळे रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणीच सिझेरियन ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक काही वर्षांपासून करत आहेत. मात्र, या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयातील एमआरआय मशिन आणि लहान मुलांच्या दंत तपासणीसाठीचे एक्‍सरे मशिन बंद अवस्थेत आहेत.

याबाबत नगरसेविका हर्षाली माथवड म्हणाल्या, ‘सुतार दवाखान्यातील निवासी डॉक्‍टर आणि कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी पालिकेच्या आरोग्यप्रमुखांकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.

गोरगरीब लोकांसाठी असलेल्या या दवाखान्यात सुविधा देण्यात पालिका कायम अपयशी ठरते. सुतार दवाखान्यात लहान मुलांच्या दातासाठीचे एक्‍सरे मशिन बंद असल्याने कोणतेही उपचार करण्यात येत नाही. केवळ चिठ्ठी दिली जाते आणि खासगी दवाखान्यात जावे लागते. तसेच मयताचे पास देखील वेळेत मिळत नाही. 
- मनोज शिंदे, नागरिक

या दवाखान्यात सिझेरियनची व्यवस्था उपलब्ध नाही. यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या जिवाला धोका निर्माण होतो, तसेच लहान मुलांसाठी आयसीयू विभागही उपलब्ध नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
- कमल शेंडगे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT