पश्चिम बंगालचे नवे
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
कोलकाता ः पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी हेच आता नवे मुख्यमंत्री होणार आहेत. पश्चिम बंगाल भाजपने याची घोषणा शुक्रवारी (ता.८) केली. पश्चिम बंगालच्या सत्ता स्थापनेचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी कोलकाता येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यकारिणी आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, निवडणुका संपल्या असून पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आता सर्वांनी एकच नाव पुढे केले आहे. दुसरे नाव निवडण्यासाठी नेत्यांना वेळ देण्यात आली, मात्र दुसऱ्या कुणाचेही नाव पुढे आले नाही. यामुळे आता सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.