पुणे

जैन समाज बालांचे शिबीर बातमी

CD

PNE26W54723 - सविशुद्ध शिबीरात सहभागी किशोर श्रावक.

१५० बाल श्रावक-श्राविकांना धर्मशिक्षणाचे धडे
‘सुविशुद्ध’ शिबिरात पहाटे ५ ते रात्री ९पर्यंत विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३ : पहाटे ५ वाजता नमोकार मंत्र जागरणाने दिवसाची सुरुवात... त्यानंतर योग, प्रार्थना, धर्मशिक्षण, पूजाविधी व साधना. दुपारी ॲनिमेशन व पीपीटीच्या माध्यमातून धार्मिक शिक्षण, तर सायंकाळी गुरुभक्ती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वैयावृत्ती (सेवा). अशा पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंतच्या दिनक्रमातून ८ ते २१ वयोगटातील १५० बाल श्रावक-श्राविका धर्मशिक्षणासोबत संस्कार, साधना, संयम व शिस्तीचे धडे घेत आहेत.
बाळीवेस येथील श्री गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठानच्या मंदिराच्या प्रांगणात २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘सुविशुद्ध बाल संस्कारारोपण’ निवासी शिबिर सुरू आहे. परमपूज्य मुनी श्री १०८ सुप्रभ सागर महाराज, प्रणत सागर महाराज, विप्रज्ञ सागर महाराज आणि बा. ब्र. साकेत भैया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच निवासी स्वरूपात हे शिबिर होत आहे. सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या शिबिरार्थींचे बालवर्धमान, गुरु विराग आणि युथ सुविशुद्ध असे तीन गट करण्यात आले आहेत. उत्कर्ष समूह (भारत) यांनी शिबिराचे आयोजन केले आहे.
---------------------------
पडगाहनचे प्रशिक्षण
सकाळच्या सत्रात धार्मिक शिक्षणासोबत महाराजांना आहार देण्याची पद्धत आणि नवधा भक्तीने पडगाहन करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दुपारी झूम, ॲनिमेशन आणि पीपीटीच्या माध्यमातून धार्मिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. सायंकाळी ‘मस्ती की पाठशाळा’, ‘सम्यक समाधान’, गुरुभक्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिव्हेशनल मार्गदर्शन, भजन, संगीत आणि वैयावृत्ती असे उपक्रम होतात.

शिबिरार्थींना साहित्य
शिबिरार्थींना दोन धोती-दुपट्टे, दोन टी-शर्ट, मुलींना एक साडी व दोन टी-शर्ट देण्यात आले आहेत. तसेच बॅग, वही, पेन, ओळखपत्र आणि जैन धार्मिक शास्त्र मोफत देण्यात आले आहे. अल्पोपहार, भोजन, निवास व बसची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली आहे. धार्मिक शिक्षणाच्या वर्गात पंडित काळेगोरे, पंडित रवींद्र काळे आणि पंडित संदेश बोराळकर मार्गदर्शन करत आहेत. ज्ञान, संस्कार, साधना, आराधना, भक्ती, संयम, शिस्त आणि योगाचे शिक्षण देत नैतिक मूल्ये रुजवणे व संस्कारक्षम पिढी घडवणे हा शिबिराचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT