Swasthyam 2022 Sakal
पुणे

Swasthyam 2022: पुण्यात आरोग्याचा 'मेगा इव्हेंट', संपूर्ण माहिती एका क्लिकवर

डॉ. हंसाजी योगेंद्र, श्री गौरांग दास व श्री एम यांचे मार्गदर्शन; संगीत व गायनाचीही मेजवानी

सकाळ वृत्तसेवा

Swasthyam 2022

पुणे : धावपळीच्या युगात शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन गरजेचे आहे. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेंतर्गत विश्व कल्याणाच्या उद्देशाने ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय संपूर्ण आरोग्याच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमासाठी नागरिकांची उत्स्फूर्त नोंदणी झाली आहे.

‘स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत नागरिकांना तंदुरुस्ती, योग, प्राणायाम, अध्यात्म आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून मिळणार आहे. ‘स्वास्थ्यम्’चे उद्‍घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?

प्रत्येक पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मानसिक त्रास होत असतो. त्यातील फक्त १० टक्के लोकांना उपचार मिळतात. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.

तीन दिवसांत यांचे मिळणार मार्गदर्शन व विषय

  • डॉ. हंसाजी योगेंद्र : योगासाठी सकस आहार आणि योगातून अध्यात्माकडे

  • ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : मानसिक आरोग्यासाठी कलेची साधना

  • अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य

  • योग गुरू श्री एम : योग, प्राणायाम आणि निरोगी शरीर

  • नूपुर पाटील : सकस, जैविक आहार आणि आरोग्य

  • प्रियंका पटेल : साउंड बाथ थेरपी, मनाचे आणि शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सौम्य आणि उपचारात्मक थेरपी

  • अभिनेत्री शिल्पा शेट्टी : योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैली

  • सर्वेश शशी : आरोग्यासाठी अध्यात्म

  • अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक स्वास्थ्य

  • सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व शास्त्रीय संगीतकार उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायन

  • व्यक्तिगत सहभागासाठी : व्यक्तीचे नाव, वयोगट, पत्ता, नोकरी/व्यवसाय व संपर्क क्रमांक

  • संस्था व ग्रुप्सच्या सहभागासाठी : स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्था, ग्रुप्सचे नाव, कार्य व प्रकल्पाची माहिती, पत्ता व संपर्क क्रमांक

  • ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

मिळणार ही माहिती

  • अध्यात्म आणि मानसिक स्वास्थ्य

  • सुदृढ आरोग्य राखण्यासाठी अध्यात्म

  • योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैली

  • सकस, जैविक आहार आणि आरोग्य

  • योग व मानसिक आरोग्याचा समन्वय

  • संगीत, गायन व कलेचा मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम

  • हास्यपूर्ण जीवन हेच निरोगी आरोग्यासाठी औषध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT