corona-v.jpg 
पुणे

कोरोना काळात वाघोली केंद्राचा झालाय मोठा फायदा; कसा तो वाचा सविस्तर 

सकाळवृत्तसेवा

वाघोली : वाघोली येथील बीजेएस क्वारंटाईन सेंटरमध्ये 35 दिवसांत 221 जणांचे स्वँब घेण्यात आले. त्यातील 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे सरासरी 10 टक्के पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण आहे.

26 मे रोजी येथे स्वँब घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या सेंटर अंतर्गत हवेली व शिरूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जोडण्यात आले आहे.

वाघोली, वाडेबोलाई, पेरणे, कोरेगाव भीमा, शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. पूर्वी या भागातील संशयीताना पुणे शहरात स्वँब तपासणीसाठी जावे लागत होते. मात्र वाघोलीत सोय झाल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नागरिकांची चांगली सोय झाली. बीजेएस क्वारंटाईचे सेंटर 1000 क्षमतेचे आहे. मात्र संशयित घरीच राहणे पसंत करीत आहेत. येथे घेतलेले स्वँब तपासणी साठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवले जातात. त्याचा अहवाल 24 ते 30 तासात प्राप्त होतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, तपासणीसाठी दूरवर जाण्याची गरज पडत नसल्याने संशयित तपासणीसाठी लगेच पुढे येतात. पॉझिटिव्ह आलेले 22 रुग्ण हे सहा प्राथमिक केंद्र अंतर्गत आहेत. बुधवारी नऊ जणांचे स्वँब घेण्यात आले होते. त्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर गुरुवारी 18 जणांचे स्वँब घेण्यात आले. त्याचा अहवाल उद्या प्राप्त होईल. मखरे हे या केंद्राचे नोडल ऑफिसर आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Nagpur News : महिलेच्या पोटातून काढला १३ किलो वजनाचा फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर

Latest Marathi News Live Update: मुंबईमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल...

Railway Police : लोहमार्ग पोलिस दलात राजश्री नाणेकर यांची निवड

SCROLL FOR NEXT