पुणे

पुण्यात स्वॅब टेस्टिंगमध्ये गोलमाल; लॉकडाउनमधील लूट 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे -  कोरोनाने लोकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा केला असताना पुण्यात मात्र, लोकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या तपासणीतूनही पैसा कमाईचा "उद्योग' चालविला जात असल्याचे उघड झाले आहे. स्वस्तात "स्वॅब टेस्ट'ची तयारी दाखवून काम मिळविलेली एजन्सी लोकांकडून जवळजवळ दुप्पट पैसे घेत आहे. परदेशातून आलेल्या आणि हॉटेल क्वॉरंटाइन केलेल्या प्रवाशांकडून अशा प्रकारे पैसे वसूल केले जात आहेत. 

या चाचणीसाठी अडीच हजार रुपये लागतात. प्रत्यक्षात मात्र साडेचार हजार रुपये घेतले जातात. बांगला देशातून पुण्यात आलेल्या तेजल चोरडियाच्या चाचणीसाठी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी साडेचार हजार रुपयांचा तगादा लावला. याबाबत तिने महापालिकेकडे तक्रार केली तेव्हा चक्क मोफत तपासणी करू; पण तक्रार नको, अशी विनवणी एजन्सीच्या प्रमुखांनी तेजलला केली. त्यानंतर क्वारंटाइनमधील गैरव्यवहाराचे एक उदाहरण ठळक झाले. एवढे होऊनही एजन्सीच्या "उद्योगा'ची महापालिकेच्या आरोग्य खात्याला पुसटशीही कल्पना नाही. 

महापालिकेत मोफत; पण... 
पुण्यात "स्वेब टेस्ट' वाढविल्या आहेत. महापालिका ही तपासणी मोफत करते. तर, क्रस्ना डायमोस्टिक या एजन्सीला काम देऊन प्रत्येक व्यक्तीकडून अडीच हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला आहे. मात्र "क्रस्ना'चे अधिकारी सरसकट साडेचार हजार रुपये घेत आहेत. या तपासणीसाठी "क्रस्ना'ने खास बस उपलब्ध केल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वसुलीचे काम हॉटेलकडे 
परदेशातून आलेल्या साडेचारशे प्रवाशांना 14 दिवसांसाठी महापालिकेने हॉटेलमध्ये ठेवले आहे. क्वॉरंटाइनचा कालावधी संपण्याआधी दोन दिवस या लोकांचे स्वॅब घेण्यात येतात. त्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागण्याची जबाबदारी हॉटेल व्यवस्थापनाकडे देण्यात आली आहे. मुळात, व्यवस्थापनाला अधिकार नसतानाही सर्रास पैसे वसूल केले जात आहेत. 

31 मेपर्यंत तपासणी झालेले नागरिक 

49 हजार 392 - महापालिका 
6 हजार 762  - क्रस्ना 
6 हजार 472  - पॉझिटिव्ह रुग्ण 
2 हजार 376  - उपचार सुरू असलेले 

परदेशातून आलेल्या प्रवाशांना महापालिकेकडे मोफत स्वॅब टेस्ट करता येते. त्याशिवाय ज्यांना खासगी लॅबमध्ये तपासणी करायची आहे, त्यासाठी अधिकृत यादी जाहीर केली आहे. त्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. 
-डॉ. रामचंद्र हंकारे, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT