पुणे

‘स्वप्नवेध’तर्फे पुरस्कारांचे वितरण

CD

खोडद, ता. १९ : मंगरूळ (ता. जुन्नर) येथील स्वप्नवेध अनाथालयाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या श्वेता ढोबळे, चंदाताई गाडगे, योगिता कणसे, रूपाली पवार, सुरेखा काटे, रूपाली येवले, मंगल भोजने, पुनम फाकटकर, हेमलता शिंदे, वर्षा डुकरे यांना हिरकणी तर नीलेश लामखडे, शिवाजी खराडे, पत्रकार सुनील गहिने, होमगार्ड गणेश गाडगे, धावपट्टू रमेश खरमाळे, बाळासाहेब शिरतार, डॉ. किरण भांगरे, अशोक तट्टू, मंगेश चिंचवडे, पप्पू डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.
अनाथालयाचे अध्यक्ष सचिन भोजने आणि मंगल भोजने हे मागील अनेक वर्षांपासून अनाथ व गरजू लहान मुलांचे आई-वडिलांप्रमाणे संगोपन करतात तसेच त्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी हे दांपत्य प्रयत्नशील आहेत. समाजातील वंचित आणि गरजू घटकांना आधार देण्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे कार्यदेखील स्वप्नवेध संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिल्लारी, बबन महाराज डुकरे, राजू महाराज पानसरे, आरटीओ अधिकारी सुनील मुळे, जलसंपदा विभागाच्या सहाय्यक निबंधक प्रतीक्षा भोजने, सरपंच मनीषा खिल्लारी, पोलिस पाटील विकास घोलप, महाराष्ट्र पोलिस दलातील छाया व्यवहारे, ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष संतोष काळे, ग्रामसेवक प्रवीण खराडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT