पुणे

​भारतीय बॉल बॅडमिंटन संघात सासवडच्या स्वराची निवड

CD

सासवड, ता. ४ : सासवड (ता. पुरंदर) येथील उदयोन्मुख खेळाडू स्वरा योगेश इनामके हिची मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे सासवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
​स्वराने सातवीपासून सासवडच्या म. ए. सो. वाघिरे विद्यालयातून खेळाला सुरुवात केली. तिला हिरामण सहारे, संजय महाजन आणि मयूर जांभळे यांचे मार्गदर्शन लाभले. आतापर्यंत तीनवेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवणाऱ्या स्वराला दोन वेळा ‘बेस्ट अपकमिंग प्लेयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. स्वरा सध्या वाघिरे विद्यालयात १० वीत शिकत असून सासवड बॉल बॅडमिंटन क्लबमध्ये सराव करते.
तिने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, कुटुंब आणि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे सचिव अतुल इंगळे तसेच पुणे जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. स्वराच्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज विद्यार्थ्याला वडिलांची कॉलेजमध्ये घुसून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त! प्रति 100 ग्रॅममागे तब्बल 95,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलार पोर्टल बदलांवरून महावितरणविरोधात मोर्चा

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा भडका की पावसाची एन्ट्री? पुढील 48 तास ठरणार निर्णायक; हवामान खात्याचा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा!

'रक्ताच्या उलट्या झाल्या, बेशुद्ध पडले अन्...' दीपाली सय्यदने सांगितला भंयकर प्रसंग, म्हणाली..'माझे डोळे वर गेले आणि...'

SCROLL FOR NEXT