पुणे - खडकवासला मतदारसंघाच्या महापालिका हद्दीतील विविध प्रश्नांवर महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत चर्चा करताना आमदार भीमराव तापकीर व अन्य. 
पुणे

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग होणार भुयारी

सकाळवृत्तसेवा

खडकवासला - स्वारगेट ते कात्रज या दरम्यान मेट्रोचा मार्ग भुयारी होणार आहे. महापालिका हद्दीतील खडकवासला मतदार संघाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये आयुक्तांनी ही माहिती दिल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन प्रकल्पासाठीची कार्यवाही वेगाने करण्याची मागणी तापकीर यांनी केली. आयुक्तांनी हा मार्ग भुयारी असणार असल्याची माहिती दिली. बैठकीला नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका राणी भोसले, नगरसेविका वृषाली चौधरी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेरनार, मुख्य अभियंता पथ विभाग व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रकल्प श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.

यावेळी शिवणे, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे व उत्तमनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुणे पालिकेकडे वर्ग करणे, वारजे ते नवले ब्रिज महामार्गावरील रस्त्यालगतच्या साचलेल्या कचऱ्यामुळे पसरलेल्या दुर्गंधी असते, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, सर्व्हिस रस्त्याचे प्रलंबित कामासह भारती रुग्णालयातून चैतन्यनगरकडे जाणारा रस्ता खुला करावा, महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागा ‘पीएमआरडीए’कडून महानगर पालिकेकडे हस्तांतरित करणे, कोथरूड डेपो चौक-पौड रस्ता रुंदीकरण,  एकलव्य कॉलेज ते डावी भुसारी कॉलनी लगत सर्व्हिस रोडला जोडणारा डीपी रस्ता भूसंपादन प्रक्रिया यावर चर्चा सकारात्मक झाली, असे ही तापकीर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT