Metro 
पुणे

स्वारगेट ते निगडीदरम्यान मेट्रोला मंजुरी

सकाळवृत्तसेवा

प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटींचा खर्च; २१ किलोमीटर धावणार
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून निगडी येथील भक्तीशक्ती चौकापर्यंत मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने बुधवारी (ता. २७) मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे आता स्वारगेटपासून निगडीपर्यंत २१ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावेल. 

महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट या १६.५ किलोमीटर मार्गासाठी दोन वर्षांपूर्वी काम सुरू केले. मेट्रो महापालिका भवनापासून दापोडीपर्यंत येत्या डिसेंबरला, तर स्वारगेटपर्यंत नोव्हेंबर २०२१ पर्यंत धावेल, असे नियोजन करून महामेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी नागरिक करीत होते. ती लक्षात घेऊन पालिकेने महामेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करून घेतला व त्याला डिसेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली. त्‍या प्रस्तावाला राज्य सरकारची बुधवारी  मंजुरी मिळाली.

महापालिका भवन ते भक्तीशक्ती चौक, निगडी हा उन्नत मार्ग असून, त्याचे अंतर ४.४१ किलोमीटर आहे. चिंचवड, आकुर्डी आणि निगडी ही तीन स्थानके असतील. २०२३ मध्ये या मार्गावर रोज सुमारे ४.९५ लाख प्रवासी असतील, असा अंदाज आहे. व्हायाडक्‍ट (पूल), स्थानके व अन्य स्थापत्य कामांसाठी ४०५ कोटी रुपये, सिस्टिम, लोहमार्ग, सिग्नलिंग आदी कामांसाठी ३४५ कोटी रुपये, जमिनीसाठी १८४ कोटी रुपये, डेपोसाठी ४२ कोटी रुपये यांसह अन्य खर्च गृहीत धरून या प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपये खर्च येईल, असे प्रकल्प अहवालात नमूद केले आहे. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व दाट लोकवस्तीचे भाग मेट्रोमुळे जोडले जातील. प्रभावी शहरी वाहतूक व्यवस्था शहरवासीयांना मिळेल.’’

पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाची नितांत गरज आहे. निगडी ते स्वारगेटदरम्यानचा भाग मेट्रोमुळे जोडला जाईल. या विस्तारामुळे पिंपरी-चिंचवडमधील दाट लोकवस्तीचा भाग जोडण्याचे काम होईल.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित,  व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

द ग्रेट खलीच्या कारचा अपघात; अशी झाली अवस्था, व्हिडीओ शेअर करत सांगितलं काय घडलं

Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

खिशात फक्त 20 पैसे, तीन दिवस उपाशी… जावेद अख्तरांनी सांगितला मुंबईतील संघर्षाचा काळ, म्हणाले...

Nepal Flood : नेपाळच्या महापुरादरम्यान थरारक घटना ! एका साडीने वाचवला २१ जणांचा जीव; चेन्नईतील भाविकांनी सांगितली आपबीती

SCROLL FOR NEXT