Swargate Underground Metro Station Images Esakal
पुणे

Swargate Metro Station Photos: आरारा... खतरनाक... अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्टेशनचे फोटो व्हायरल; उद्घाटनापूर्वी पाहा झलक

Swargate Underground Metro Station First Look Viral: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये शिवजीनगर ते स्वारगेट मार्गाचा समावेश आहे.

आशुतोष मसगौंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (26 सप्टेंबर) रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनची काही मनमोहक छायाचित्रे पुणे मेट्रोने त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केली आहेत.

पुणे मेट्रोने स्वारगेट स्थानकाचे फोटो शेअर केल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी एका एक्स युजरने स्वारगेट अंडरग्राउंड स्टेशनचा व्हिडिओ शेअर करण्याचीही मागणी केली आहे.

Pune Metro Underground Swargate Station

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 26 सप्टेंबर रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुण्यातील दिवाणी न्यायालयातून स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जय्यत तयारी सुरू आहे.

Pune Metro Underground Swargate Station

कसा असेल पंतप्रधानांचा दौरा?

- मोदी गुरुवारी संध्याकाळी 5.35 वाजता पुणे विमानतळावर पोहोचतील

- मोदी पुणे विमानतळावरून संध्याकाळी 5.55 वाजता शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर पोहोचतील.

- शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ते स्वारगेट पर्यंत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील.

- मोदी मेट्रोने स्वारगेटला पोहोचतील.

- यानंतर पंतप्रधान मोदी स्वारगेट ते कात्रज या नवीन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करणार आहेत.

- पीएम मोदी स्वारगेटहून 6.30 वाजता एसपी कॉलेजच्या ठिकाणी पोहोचतील.

- पंतप्रधान संध्याकाळी 7.55 वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना होतील.

Pune Metro Underground Swargate Station

पंतप्रधान मोदी आणि पुणे मेट्रो

पुणे मेट्रो दोन कंपन्यांद्वारे बांधली जात आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा-मेट्रो) जी दोन लाईन्स हाताळत आहे आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (PMRDA) जे टाटा समूहाच्या सहकार्याने तिसऱ्या लाईनचे व्यवस्थापन करत आहेत.

भूमिपूजन समारंभ आणि उद्घाटन समारंभासह पुणे मेट्रोच्या पाच कार्यक्रमांमध्ये मोदी वैयक्तिकरित्या सहभागी झाले आहेत. आणि एकदा कोलकाता येथून PMRDA मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मेट्रोच्या मार्गाचे भूमिपुजन केले होते.

डिसेंबर 2018 मध्ये बालेवाडी स्टेडियम येथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पायाभरणी करण्यासाठी ते आले होते.

6 मार्च 2022 रोजी, मोदींनी गरवारे कॉलेज ते वनाज मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: सर्पमित्र कोब्रा पकडत होता, तेवढ्याच सापाने केला दंश... जाग्यावरच कोसळला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार प्रिया बापट आणि उमेश कामत; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

घरातच निघाला चोर! आलियाला तिच्याच मॅनेजरने फसवलं, तब्बल 77 लाख लुबाडले, अखेर अटक

Latest Maharashtra News Live Updates: गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका; शेतकरी व नागरिकांचे हाल

Wimbledon 2025: भारत-पाक सामन्याएवढाच टेनिसपटूंवरही तणाव : विराट कोहली

SCROLL FOR NEXT