4 Years Boy Kidnapped Case 
पुणे

अपहरण झालेल्या मुलाला घरापर्यंत पोचवणारी व्यक्ती कोण? वाचा कसा सापडला 'डुग्गू '?

सकाळ डिजिटल टीम

पुणे: पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षांचा मुलगा स्वर्णव गेल्या काही दिवसांपासून हरवला होता. त्याचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. अखेर आठ दिवसांनी त्यांचा चिमुरडा सापडला आहे. ११ जानेवारीला त्याचं बालेवाडीतून अपहरण झालं होतं. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले.(Swarnav Kidnapping Case: Rescued from punawale crime branch police)

तो कसा सापडला असा प्रश्न प्रत्येकाला पडणं स्वाभाविक आहे. त्याचीच ही रंजक कहाणी...

सुरक्षा रक्षक बनले 'देवदूत'

आज बुधवारी दुपारी अपहरण झालेल्या या चिमुरड्याला पूनावळे येथे आरोपी व्यक्तीने सोडून दिलं होतं. पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मुलाला ताब्यात घेउन त्याच्या पालकांकडे सुपुर्द केलंय. मुलगा सुखरूप असून त्याला कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्याजवळ स्वर्णवला सोडण्यात आलं होतं. आरोपीने स्वर्णव ऊर्फ डूग्गू याला त्यांच्याकडे सोपवलं आणि तिथून पळ काढला. दादाराव जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून याबाबतची पोलीसांना माहिती दिली आणि त्यानंतर स्वर्णव आपल्या घरी सुखरुप पोहोचला.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की, "अपहरण झालेला मुलगा सुखरूप मिळाला आहे, या प्रकरणाचा तपास सुरु आहे, लवकरच आम्ही आरोपीपर्यंतही पोहोचू"

"मागील 8 दिवसापासून आम्ही मुलाचा शोध घेत होतो. पोलिसांची अनेक पथके दिवस रात्र काम करीत होती. आज दुपारी मुलगा पुनावले येथे मिळाला. तो सुखरूप असून त्याला पालकांकडे सुपुर्द केले आहे." असं पोलिस सहआयुक्त डॉ. रविन्द्र शिसवे यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT