बहुवर्गीय पीक लागवडीतून
शेतीतील यशाेगाथेची मांडणी
अचूक व्यवस्थापनातून स्वाती जाधव यांची भरारी
पुरुषोत्तम डेरे : सकाळ वृत्तसेवा
जिद्द, परिश्रम आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून बोपेगाव (ता. वाई) येथील स्वाती मंगेश जाधव यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी यशोगाथा निर्माण केली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या नावीन्यपूर्ण कामामुळे त्यांना “कृषीलक्ष्मी साताऱ्याची महिला शेतकरी सन्मान व गुणगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.
स्वाती जाधव यांनी ॲग्री डिप्लोमा शिक्षण पूर्ण करून आधुनिक आणि विविध पिकांवर आधारित शेतीचा मार्ग निवडला. पारंपरिक शेतीपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी आपल्या शेतात विविध फळ, भाजीपाला, मसाला व फुलपिकांची लागवड केली आहे.
त्यांच्या शेतात सघन आंबा लागवड, कलिंगड, स्ट्रॉबेरी आणि केळी यांसारख्या फळपिकांची लागवड केली जाते, तसेच मसाला पिकांमध्ये हळद व मिरचीची लागवड केली जाते. फळभाज्यांमध्ये टोमॅटो, सिमला मिरची, काकडी व वांगी, तर फुलपिकांमध्ये गुलाब, झेंडू आणि शेवंतीची उत्पादनक्षम शेती त्यांनी विकसित केली आहे.
आधुनिक शेतीत पुढाकार घेत स्वाती जाधव यांनी हरितगृहात रंगीत सिमला मिरचीचे उत्पादन सुरू केले असून, उतीसंवर्धित केळी, तसेच स्ट्रॉबेरी रोपवाटिका तयार करून शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्याचे कार्यही सुरू केले आहे.
स्वाती जाधव यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “आधुनिक शेतीत महिलाही यशस्वी उद्योजक बनू शकतात” हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे.
...........................................
महिलांना नवी दृष्टी
शेतीत उत्पादन वाढीसोबत व्यवस्थापनालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले आहे. मजूर व्यवस्थापन, उत्पादनाचे ग्रेडिंग, पॅकिंग, व्हॅल्यू ॲडिशन, डिस्पॅच, तसेच फवारणी व्यवस्थापन यामध्ये त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब केला आहे. याची दखल घेत आकाशवाणीवर ‘आत्मनिर्भर शेतकरी महिलांचा शेतीतील सहभाग आणि केलेले बदल’ या विषयावर त्यांची मुलाखत प्रसारित झाली होती. त्यांच्या अनुभवातून अनेक महिला शेतीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागल्या आहेत.
.............................................
फोटो :.........KAV26B01347, KAV26B01348
बोपेगाव (ता. वाई) : आधुनिक शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेऊन वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रगत महिला शेतकरी स्वाती मंगेश जाधव.
..................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.