Swati Kabadi as Sarpanch of Padali Barav gram panchayat after 22 years Padali Vasti got opportunity of Sarpanch post
Swati Kabadi as Sarpanch of Padali Barav gram panchayat after 22 years Padali Vasti got opportunity of Sarpanch post Sakal
पुणे

Pune : पाडळी बारवच्या सरपंच पदी स्वाती कबाडी; 22 वर्षानंतर पाडळी वस्तीला मिळाली सरपंच पदाची संधी

सकाळ वृत्तसेवा

आपटाळे : जुन्नर तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पाडळी बारव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या चौरंगी लढतीत पाडळी बारव ग्रामविकास पॅनेलच्या स्वाती सोपान कबाडी यांनी बाजी मारली. स्वाती कबाडी यांना 1151 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी शिवनेरी ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार सोनाली सतीश लोखंडे यांना 928 मते,

शिवाई देवी ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार क्रांती मल्हारी चव्हाण यांना 492 मते तर श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार रेखा नवनाथ कबाडी यांना 225 मते मिळाली. तब्बल बावीस वर्षांनंतर पाडळी वस्तीला सरपंच पदाची संधी मिळाल्याने पाडळी ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला.

पाडळी बारव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक दोन मधून जितेंद्र तालेवार कबाडी, अश्विनी गणेश कबाडी व वसुधा राजू कबाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित सदस्य पदाच्या बारा जागासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली.

बारा जागापैकी पाडळी बारव ग्रामविकास पॅनेल ला फक्त दोनच जागांवर विजय मिळवण्यात यश आले. पाडळी बारव ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्रमांक एकमधून संतोष मारुती केदारी तर वार्ड क्रमांक 3 मधून ज्योती जयसिंग पापडे हे उमेदवार विजयी झाले.

पॅनेलप्रमुख असलेल्या माजी लोकनियुक्त सरपंच संतोष केदारी यांच्या बारव या भागातून या पॅनलचे एकूण तीन वार्डातून नऊ उमेदवारापैकी फक्त एकच उमेदवार निवडून आला आहे. माजी लोकनियुक्त सरपंच संतोष केदारी व माजी सरपंच ज्ञानेश्वर कबाडी यांनी पाडळी बारव ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व केले.

शिवनेरी ग्रामविकास पॅनेलने बारा पैकी नऊ जागांवर निवडणूक लढवली. नऊ पैकी सहा जागांवर शिवनेरी ग्रामविकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. वार्ड क्रमांक एक मधून मनीषा अनंत रेंगडे, वार्ड क्रमांक चार मधून संजय गोविंदसिंह राजपूत,

शीतल विनायक कळंबे, जिजाबाई शांताराम रेंगडे तर वार्ड क्रमांक पाच मधून आदिती बाळासाहेब सदाकाळ व सय्यद नेमतअली फजल हुसेन हे उमेदवार विजयी झाले. या पॅनलचे नेतृत्व संजय परदेशी यांनी केले होते.

शिवाई देवी ग्रामविकास पॅनलने देखील बारा पैकी नऊ जागा लढविल्या. नऊ पैकी दोन जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये वार्ड क्रमांक एक मधून मनीषा हनुमंत लोखंडे व वार्ड क्रमांक पाच मधून माजी उपसरपंच राजेश धारू कारभळ हे उमेदवार विजयी झाले.

या पॅनलचे नेतृत्व राजेश कारभळ यांनी केले होते. उपसरपंच निवडणुकीच्या वेळी राजेश कारभळ यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे. तर श्री हनुमान ग्रामविकास पॅनेल ने तीन जागावर निवडणुक लढवली त्यापैकी दोन जागांवर विजय मिळवला. वार्ड क्रमांक तीन मधून आत्माराम ज्ञानेश्वर कबाडी, पुष्पा बाळू कडू हे उमेदवार विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT