पुणे

संघर्षावर मात करत रचली यशाची गाथा

CD

ऐन तारुण्यात आयुष्याचा सोबती गेल्यानंतर दुःख करत न बसता दोन लहान मुलांमध्ये उद्याचे भविष्य पाहात पारंपरिक सोनार-सराफी व्यवसायासाठी तिने कंबर कसली. आणि अल्पावधीत व्यवसाय विकासाचे पतीचे स्वप्न पूर्ण केले. सुपे (ता. बारामती) येथील या हिरकणीचे नाव आहे स्वाती सचिन कुलथे.
काही महिन्यांपूर्वी बारामती शहरातील पेन्सील चौकात एस फेवर कॉस्मेटोलॉजी अँड अस्थेटिक स्किन हब थाटले. मुंबई, पुण्यानंतर बारामतीत ही स्कीन हबची सुविधा सुरू झाली. अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या या हबला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. या नवीन व्यवसायाने स्वाती यांचे आयुष्य उजळले. शून्यातून सुरू केलेला छोटा व्यवसाय ते उद्योजिका अशी त्यांनी भरारी घेतली.
पारंपरिक व्यवसाय हा केवळ उत्पन्नाचे साधन नसून कुटुंबाच्या परंपरेचा आणि विश्‍वासाचा वारसा असतो. पतीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने आर्थिक आव्हाने उभी ठाकली. अशा कठीण प्रसंगी खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय स्वातीताईंनी घेतला. दोन लहान मुले, त्यांचे शिक्षण आणि व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेतली. सुरुवातीला अनुभवाचा अभाव, व्यवसायातील स्पर्धा अशा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. मात्र जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी व्यवसायाची घडी पुन्हा बसवली. सुप्याच्या बाजारपेठेत सचिन ज्वेलर्स नावाने सुवर्णपेढी नावारूपास आणली. लग्नसमारंभासाठी खास डिझाईन्स, पारंपरिक व आधुनिक कलेक्शन, शुद्धतेची हमी (हॉलमार्क), योग्य दर, उत्कृष्ट सेवा येथे पुरवली जाते. सणाच्या निमित्ताने खरेदीवर सवलत, आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात.
ग्राहकांशी जपलेले विश्‍वासाचे नाते आणि गुणवत्तेवर दिलेला भर यामुळे व्यवसाय पुन्हा तेजीत आला. आर्थिक स्थैर्य मिळवतानाच त्यांनी आधुनिक काळाची गरज ओळखली. भविष्याचा वेध घेत नवीन व्यवसायात पाऊल टाकले. नियोजनबद्ध काम, कौशल्यप्राप्त कर्मचारीवर्ग, तंत्रज्ञानाचा वापर, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने नव्या क्षेत्रातही त्यांनी यश संपादन केले. आज त्या केवळ यशस्वी उद्योजिका नसून अनेक महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत. संकटांना न घाबरता त्यांचा धैर्याने सामना केल्यास नवे क्षितिज गाठता येते, याचा जिवंत आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
बारामतीच्या एस फेवर स्किन हबला नक्कीच भेट द्यावी अशा सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या आहेत. येथे आलिशान वातावरण येथे आहे. या हबमध्ये केस, स्किन, लेसर, मेकअप, नखे, कोरियन ग्लास, बॉडी व्हिटनिग, टॅटू काढून टाकणं, वेट लॉस,लेसर ट्रीटमेंट, केमिकल पिल्स, पर्मनंट लिप आणि मेकअप अशा २५० हून धिक ट्रीटमेंट तसेच फेशियलच्या अनेक अँडव्हान्स ट्रीटमेंट, केसांच्या अँडव्हान्स ट्रीटमेंट व हेअर पॅच आदी सुविधा येथे आहेत. त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक समस्या यांचे तज्ज्ञ उपचार करणारे केंद्र म्हणजे एस फेवर. येथे विशेषतः त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या सेवा येथे उपलब्ध आहेत.

सुरक्षित, स्वच्छ, प्रसन्न वातावरण
येथे आधुनिक उपकरणे, सुरक्षित व स्वच्छ वातावरण, पिंपल्स, डाग, पिग्मेंटेशन यावर प्रभावी उपचार. ग्लोइंग स्किनसाठी खास स्कीन ट्रीटमेंट्स. आधुनिक लेझर व अँटी-एजिंग सोल्यूशन्स. केस गळतीवर प्रगत उपचार. प्रत्येक त्वचा वेगळी असते. म्हणूनच आम्ही देतो वैयक्तिक सल्ला आणि योग्य उपचार योजना. येथे प्रमाणित कॉस्मेटोलॉजिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, प्रशिक्षित ब्युटी थेरपिस्ट उपचार करतात.

अजितदादांना राखी बांधली होती
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी एस फेवरला भेट देऊन माहिती घेतली. व्यवसायवृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांचे स्वागत करून त्यांना मी राखी बांधली होती. याची आठवण स्वातीताईंनी सांगितली. हा भक्कम आधाराचा हात कायमचा गमावल्याचे सांगताना त्यांना रडू आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT