am.jpg
am.jpg 
पुणे

पुणे : लॉकडाउनच्या काळात सेवा केलेल्या पोलिसांना आंब्याची गोड भेट

सकाळवृत्तसेवा

वारजे : कोरोना  संकटाला तोंड देत रस्त्यावर उभ्या असलेल्या वारजे पोलिसांना सलाम करीत पॉप्युलर नगर परिसरातील अश्विनी छत्रपती व हर्षद छत्रपती या दांपत्यांनी वारजे येथील शंभर पोलिसांना आंब्याच्या पेट्या देऊन आगळीवेगळी भेट दिली.

लॉकडाउनमध्ये या पोलिसांना आपल्या परिवाराकडे लक्ष देता  आले नाही.  त्यामुळे अशा पोलीस परिवाराला आंब्याची चव चाखता यावी याच उद्देशाने हे आंबे पोलिसांना देण्यात आले.

वारजे पोलीस स्टेशन व  वारजे  वाहतूक विभाग यांच्याकडे या आंब्याच्या पेट्या देण्यात आल्या. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक कदम, अरविंद रासकर, संतोष भापकर, शिवानंद जाधव व वाहतूक विभागाचे  अमोल गवळी, रवींद्र अहिरे, अमोल चिपकर मयूर भोसले, प्रियांका कोंडे उपस्थित होते.

सुबोध कोळवणकर व तनया कुलकर्णी यांनी या उपक्रमाला सहाय्य केले. या लॉकडाऊन  काळात पोलिसांनी  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले काम  यशस्वीपणे पार पाडले आहे. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आंब्याच्या पेट्या पोलीसाना दिल्या  आहेत. अशी माहिती अश्विनी छत्रपती यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT