Sweetlime rate increase in Pune Market 
पुणे

मोसंबीला अच्छे दिन;एक मोसंबी तब्बल २६ रुपयांना

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बाजारात आंबेबहरातील मोसंबीची आवक अत्यल्प झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात जुन्या मोसंबीच्या तीन डझनास ९५० रुपये भाव मिळाला. त्यानुसार एक मोसंबी २७ रुपयांना पडली. किरकोळ बाजारात एक किलो मोसंबीला १५० ते १६० रुपये भाव मिळत आहे.

फळबाजारात संभाजीनगर परिसरातून आंबेबहर व मृगबहरातील मोसंबी आली आहे. घाऊक बाजारात आंबेबहरातील मोठ्या आकाराच्या तीन डझन मोसंबीला ३५० ते ९५० रुपये, तर लहान आकाराच्या चार डझनाच्या मोसंबीला १८० ते ३३० रुपये भाव मिळत आहे.

मृगबहरातील म्हणजेच नव्या मोसंबीला तीन डझनास १२० ते २८० रुपये, तर चार डझनाच्या मोसंबीला ६० ते १२० रुपये भाव मिळत आहे. रविवारी आंबेबहरातील आठ टन, तर मृगबहरातील मोसंबीची २५ टन आवक झाली.

वकिलांच्या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम

सातारा, सांगली, कोल्हापूर, बारामती येथून मोसंबीला चांगली मागणी आहे. नुकसानीमुळे आंबेबहर मोसंबीचा हंगाम यंदा दोन महिने अगोदरच संपणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत कमी प्रमाणात आवक सुुरू राहील. एका पाटीस मिळालेला ९५० रुपये उच्चांकी भाव आहे. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी ६५० रुपये उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती दासराव पाटील यांनी दिली.

''माझ्याकडे एक हजार झाडांची बाग आहे. यंदा पावसामुळे मोठे नुकसान झाले. बाजारात मोसंबीला भाव चांगला आहे. मात्र, आंबेबहरातील मोसंबीचे उत्पादन अत्यल्प झाले आहे. मात्र, मृग बहरातील उत्पादन चांगले मिळेल.
- अस्लम शेख, शेतकरी, पैठण


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT