पुणे

गोडया पाण्यातील मत्स्य शेती, शोभिवंत मत्स्य शेतीतुन रोजगार निर्मितीला चालना मिळेल,मुळदे येथील कार्यक्रमात तज्ञांचे मत,

CD

गोड्या पाण्यातील, शोभिवंत
मत्स्यशेतीतून रोजगाराला चालना

मुळदे येथील कार्यक्रमात मत्स्य तज्ज्ञांचे मत

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : गोड्या पाण्यातील मत्स्य शेती आणि शोभिवंत मत्स्य पालनातून रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते, असे मत मत्स्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुळदे संशोधन केंद्रात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, मत्स्य प्रकल्पाचे प्रमुख डॉ. कल्पेश शिंदे, सहायक प्राध्यापक डॉ. कृपेश सावंत, विनय सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.
गोड्या पाण्यातील माशांना मागणी वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातून रोजगार निर्मितीला मोठी संधी आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात मत्स्य शेतीला संधी आहे. त्यामुळे मुळदे मत्स्य संशोधन केंद्रात गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज निर्मितीवर भर दिला जात असल्याचे संशोधन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त कटला जातीच्या नर आणि मादी माशांना जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते प्रेरक इंजेक्शन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यशेती आणि शोभिवंत मत्स्य पालनासंदर्भात संशोधन केंद्राकडून सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले.
सुयोग्य आकाराच्या आणि उत्तम गुणवत्तेच्या कार्प मत्स्य बीजाचे सातत्यपूर्ण उत्पादन करून मत्स्यबीजाची मागणी आणि पुरवठा यांतील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने ‘सिंधुरत्न समृद्ध’ योजनेअंतर्गत कार्प मत्स्यबीज केंद्र स्थापन करण्यात आले असल्याचे मुळदे संशोधन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Fine Arts BFA Admission: कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ; अभ्यासक्रमासाठी १ हजार ३७९ विद्यार्थ्यांची नोंदणी

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात; व्हिडिओ व्हायरल!

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT