पुणे

राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रलंबित खटले निकाली काढा नसरापूर प्रकरणाच्या निकालानंतर अॅड कोमल साळुंखे-ढोबळे यांची मागणी

CD

एका नव्हे, सर्वच अत्याचार
प्रकरणांना जलद न्याय द्या
ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २६ : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाचा अवघ्या ५५ दिवसांत निकाल लागणे ही न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. मात्र, सरकारने केवळ एका प्रकरणापुरती तत्परता न दाखवता राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या सर्व प्रलंबित खटल्यांचाही जलद निकाल लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केली.
त्या म्हणाल्या, १ मे २०२६ रोजी नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण, अत्याचार आणि खून प्रकरणाने राज्य हादरले होते. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविल्याने पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. मात्र आजही महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. अशा सर्व खटल्यांचा जलद निकाल लागल्यास पीडितांना वेळेत न्याय मिळेल आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : वटपौर्णिमेनिमित्त कोकणातून फणस मुंबईला रवाना

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT