H1N1 
पुणे

स्वाइन फ्लूचे तेवीस रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला; तर स्वाइन फ्लूबाधित २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ४ रुग्ण कृत्रिम श्‍वासोच्छवासावर आहेत. अजमेरा कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुषाचा सोमवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना २४ ऑगस्टला उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पिंपरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारपासून (ता. १) ते कृत्रिम श्‍वासोच्छवासावर होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाल्हेकरवाडीतील ३२ वर्षीय तरुणाचा शनिवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात ३१ ऑगस्टला उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हापासूनच ते कृत्रिम श्‍वासोच्छवासावर होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या स्वाइन फ्लूबाधित २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३५ रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले; तर ११ जणांचा आतापर्यंत स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ‘नाना’ पर्वाचा अंत! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप

Dr. Neelam Gorhe : १२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

FDA Crime : विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृह बंद; ‘एफडीए’ची धडक कारवाई

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान - रामदास आठवले

Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT