Stamp 
पुणे

देशातील या नऊ राज्यांनी स्विकारली दस्त नोंदणीसाठी ही प्रणाली

सकाळवृत्तसेवा

पुणे - नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्तांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी सुरू केलेली "आय -सरिता' ही संगणक प्रणाली देशातील नऊ राज्यांनी स्विकारली आहे. त्यामुळे राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पेचात मानाचा तुरा लागला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टॅम्प रजिस्ट्रेशन ऍक्‍ट हा सर्व राज्यांमध्ये जवळपास एकसारखाच आहे. मात्र प्रत्येक राज्यात त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने अंलबजावणी केली जाते. काही ठिकाणी मुद्रांक शुल्क, दस्तनोंदणी शुल्क यामध्ये तफावत आहे. तसेच रेडी-रेकनर मध्येही मोठा फरक आहे. त्यामध्ये सुसूत्रता आणण्याबरोबरच सर्व राज्यात एकच पद्धती लागू करावी, याबाबत केंद्र सरकारच्या जमाबंदी खात्याचे संचालक के. पी. कृष्णन आणि उपसंचालक सुरेंद्र सिंग यांच्या उपस्थित मध्यंतरी पुणे शहरात एक बैठक झाली होती. विविध राज्यातील नोंदणी महानिरीक्षक या बैठकीला उपस्थित होते.या बैठकीत महाराष्ट्राकडून राबविण्यात येत असलेल्या "आय-सरिता' संगणक प्रणालीची माहिती देण्यात आली. त्यांची दखल घेऊन केंद्र सरकारने देशपातळीवर ही संगणक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता. ती विकसित करण्याचे काम "एनआयसीला' देण्यात आले होते. 

त्यानुसार एनआयसीकडून ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. देशपातळीवर ती "नॅशनल जेनरिक डॉक्‍युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टिम' (एनजीडीआरएस) या नावाने लागू करण्यात आली आहे. ही संगणक प्रणाली विकसित करताना राज्याच्या "आय सरिता' च्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे. देशातील पंजाब, झारखंड, गोव्यासह नऊ राज्यांनी ती स्विकारली आहे. त्यामुळे तेथील दस्त नोंदणीत सुसुत्रता आली आहे. केंद्र सरकारने ही स्विकारल्याने राज्याच्या नोंदणी व दस्त नोंदणी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्त नोंदणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल करीत 2002 पासून दस्त नोंदणीसाठी "सरिता' या संगणक प्रणालीचा वापर सुरू केला. त्यानंतर 2012 मध्ये संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली मध्यवर्ती पद्धतीने "आय सरिता' या संगणक प्रणालीद्वारे करण्यास सुरूवात केली.

तसेच ई-पेमेंट व ई -सर्च यासारख्या विविध ई उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली. या प्रणालीमुळे राज्यात महसूलात मोठी वाढ झाली. त्यामुळेच देशातील अन्य राज्यांनी देखील त्यांची दखल घेतली असल्याचे यावरून समोर आले आहे. 

पुण्यातील 'या' भागात पुन्हा लाॅकडाऊन; पाचव्या दिवशीच विसर्जन करण्याचे आवाहन

केंद्र सरकारने देशभरात जी "एनजीडीआरएस' ही प्रणाली लागू केली आहे. ती "आय सरिता'च्या धर्तीवरच तयार करण्यात आली आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही गौरवास्पद बाब आहे. देशातील नऊ राज्यांनी ही संगणकप्रणाली स्विकारली असून अन्य राज्यांकडून ती टेस्टिंगच्या पातळीवर आहे. 
- ओमप्रकाश देशमुख (नोंदणी महानिरीक्षक) 

या प्रणालीमुळे काय फायदा झाला. 
- नागरीकांना दस्त नोंदणी व शुल्क ऑनलाइनद्वारे करणे शक्‍य. 
-ई-सर्चमुळे मिळकतींची सर्व माहिती एका क्‍लिकवर 
-राज्याच्या सर्व डाटा एकाच ठिकाणी.
-दस्त नोंदणीत गतीमान आणि पारदर्शक पद्धतीने. 

या राज्यांची स्विकारली प्रणाली. 
-गोवा 
-हिमाचल प्रदेश 
-पंजाब 
-मणीपूर 
-झारखंड 
-मिझोराम 
-अंदमान निकोबार 
-जम्मू काश्‍मीर 
-दादरानगर हवेली 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : कोकण रेल्वेचं नवं ॲप! प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार गाड्यांची माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT