सासवड, ता. ५ : येथील मेघमल्हार संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष सांगीतिक सोहळ्यात केरळचे प्रथितयश तबलावादक अर्जुन कालीप्रसाद यांचे एकल तबला वादन झाले. त्यांना सौरभ क्षीरसागर यांनी केलेली संवादिनी साथ रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरली. प्रख्यात तबलावादक पंडित उमेश मोघे आणि ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भजनसम्राट दत्तात्रेय फडतरे, लोककलावंत दशरथ लाखे, सूत्रसंचालक नितीन राऊत, राजेंद्र मोरे आणि व्हायोलिन वादक निलिमा खंडागळे यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी गांधर्व महाविद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक अमोल बेलसरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सासवडमधील संगीतप्रेमींनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.