जुन्नर मध्ये पर्यटकांकडून सहा लाखाचा दंड वसूल sakal
पुणे

जुन्नर मध्ये पर्यटकांकडून सहा लाखाचा दंड वसूल

पर्यटकांची संख्या सुट्टीच्या दिवशी वाढल्याने पोलीसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर (junnar) तालुक्यात पावसाळी पर्यटनास आलेल्या एक हजार २२० पर्यटकांनी सहा लाख १० हजार रुपये दंड जुन्नर पोलिसांना दिला असल्याचे पोलीस (police) निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसांत ३०९ पर्यटकांकडून पोलीसांनी एक लाख ५४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

स्वातंत्र्यदिनी ४० पर्यटकाकांकडून २० हजार रुपये दंड घेण्यात आला. जुलै अखेर ९११ पर्यटकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईत चार लाख ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल झाला आहे. पर्यटनस्थळांच्या एक किलोमीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने ऐतिहासिक नाणेघाट, दाऱ्याघाट, जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी किल्ला, आंबे-हातवीज तसेच माणिकडोह, वडज धरण परिसरात पर्यटकांनी येऊ नये, असे वारंवार आवाहन करून देखील नाणेघाट, दाऱ्याघाट येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत प्रामुख्याने विकएंड व सुट्टीच्या दिवशी वाढ होत असल्याने पोलीसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. पर्यटन स्थळे खुली झाल्याचे सांगून काही उद्दाम पर्यटकांकडून या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा अकरा पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जाधव यांनी सांगितले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जोडून येत असलेल्या सुट्टयामध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून पोलीसांनी पर्यटन स्थळी बंदोबस्त वाढविला होता. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.या आदेशाची विकएंडला शनिवार , रविवार व सुट्टीच्या दिवशी अंमलबजावणी केली जात आहे. पर्यटक दंडात्मक कारवाईला सामोरे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पर्यटन स्थळाच्या एक किलोमीटर परिसरात पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास प्रतिबंध आहे तसेच धोकादायक ठिकाणी चित्रीकरण, सेल्फी काढणे यास बंदी आहे. धबधब्याचे खाली तसेच प्रवाहात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मद्य जवळ बाळगण्यास तसेच मद्यपान करण्यास देखील बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलाची छेडछाड करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.पोलीस पर्यटन स्थळांच्या मार्गावर नाकाबंदी करून तपासणी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT