marketyard
marketyard 
पुणे

मार्केट यार्डातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार : पणनमंत्री 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुलटेकडी मार्केटयार्ड येथे अनधिकृत स्टॉल, टपऱ्या आणि बांधकामांवर लवकरच कडक कारवाई करणार असल्याचे पणनमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितले. मंत्री शिंदे, कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळाची आढावा बैठक पार पडली. 

बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाजार समितीमध्ये अनेक ठिकाण अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, स्टॉल आहेत. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी पाच जणांची समिती नेमली. त्यामध्ये भाजीपाला, फळे, भुसारसह सर्व विभागांना भेट देऊन अहवाल द्यावा, तसेच आवारातील अनधिकृत स्टॉल आणि अतिक्रमणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या समितीला सात दिवसांत अवहाल देण्याची सूचना दिल्या होत्या; मात्र दोन महिने उलटूनही ना कोणता अहवाल, ना कोणती कारवाई झाली. त्यासंदर्भात पणन मंत्र्यांना विचारले असता, मार्केटयार्ड येथील अनधिकृत स्टॉल, टपऱ्या आणि बांधकामांची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. 

राष्ट्रीय बाजारासंदर्भात केंद्राने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे आम्ही राष्ट्रीय बाजार योजनेची अंमलबजावणी करणार आहोत, असेही शिंदे म्हणाले. त्यामुळे मंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई होणार की नाही याकडे बाजार घटकांचे लक्ष आहे. 
 
तोलाई प्रश्नी पुन्हा आश्वासन
गेल्या चार महिन्यांपासून गाजत असलेल्या तोलाईच्या प्रश्नावर पुण्यातील बैठकीत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन पणनमंत्र्यांनी हमाल माथाडी संघटना, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांना मुंबईत दिले होते. आजच्या बैठकीत भुसार व्यापारी, बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अभ्यास करतो. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांत सर्वांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती पणनमंत्र्यांनी दिली. हमाल माथाडी संघटनेचे सरचिटणीस हनुमंत बहिरट म्हणाले, "आम्ही आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT