Take care of the car otherwise pay penalty 
पुणे

Corona Virus : कारची काळजी घ्या, नाहीतर भुर्दंड आहेच ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या या संकटामुळे सध्या नागरिकांना घरातच बसून राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनीही 23 मार्चपासून वाहतूक बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे सुमारे 8 ते 10 दिवसांपासून नागरिकांच्या कार जागेवरच उभ्या आहेत. कार जर एकाच जागेवर सुमारे 8 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद अवस्थेत असेल तर तिची बॅटरी उतरण्याची शक्यता असते. परिणामी ती सुरू होऊ शकत नाही. तसेच कारच्या व्हिल अलाइनमेंटवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बंद असलेल्या कारची काळजी वेळेत घेतली तर पुढचा आर्थिक भुर्दंड वाचू शकतो, असे मत ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे. 
 
अशी घ्या तुमच्या कारचीची किमान काळजी 

-  दर तीन दिवसांनी कार एकदा किमान पंधरा मिनिटे सुरू करून ठेवावी 

- कार शक्यतो शेडमध्ये उभी करावी, नसेल तर  तिच्यावर कव्हर टाकावे

- कार बंद करून ठेवताना आतमधून स्वच्छ करावी तसेच सॅनिटायझरचा स्प्रे फवारला किंवा त्याद्वारे स्वच्छ केली तर उत्तम

- कार एका जागेवर आठ दिवसापेक्षा जास्त काळ उभी असेल तर त्यानंतर अधून- मधून ती मागेपुढे करावी म्हणजे टायरवर प्रतिकूल परिणाम होत नाही. 

- कार पार्क करताना  हँडब्रेकचा वापर करू नये, उतार असेल तर टायर खाली लाकडी वस्तू अथवा दगड लावावा. 

कार एकाच जागेवर अनेक दिसू उभी करायची वेळ आली तर किमान काळजी घ्यायला हवी. म्हणजे चालविण्याच्या वेळी त्रास होणार नाही. सर्वच प्रकारच्या कारची काळजी घेण्यासाठी फार वेळ द्यावा लागत नाही, पण पुढचा त्रास वाचतो, असे आम्ही नागरिकांना सांगतो. 
- संजय शेडबाळे (ऑटोमोबाईल इंजिनिअर)

- पुणे शहरातील कारची संख्या : 6 लाख 95 हजार
- पिंपरी चिंचवड मधील कारची संख्या : 3 लाख 99 हजार
- जिल्ह्यातील कारची संख्या : 1 लाख 80 हजार 

(माहितीचा स्रोत : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT