gas cylinder 
पुणे

गॅस सिलिंडरची घ्या काळजी;उन्हाळ्यातील वाढती उष्णता ठरतेय स्फोटांचे कारण 

सकाळवृत्तसेवा

पुणे - गेल्या नऊ वर्षांत शहरात एक हजार 173 गॅस गळती व सिलिंडर स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश घटना उन्हाळ्यात घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशामक दलाने केले आहे. 

बालेवाडी येथे एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात पाच कामगार जखमी झाले. जानेवारीमध्ये खराडी येथे गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट होऊन दांपत्य व त्यांचे सहा महिन्यांचे बाळ गंभीर जखमी झाले होते. या पद्धतीने प्रत्येक महिन्यात किमान पाच ते दहा घटना घडत आहेत. 

बहुतांश घटना उन्हाळ्यात घडल्याचे मागील काही वर्षांतील घटनांवरून दिसून येते. बऱ्याचदा या घटना पहाटे किंवा सकाळी घडत असल्याचे दिसून येत होते. मात्र मागील काही वर्षांपासून हे चित्र बदलत असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नऊ वर्षांतील स्फोटाच्या घटना 
2011 -119 
2012 - 148 
2013 - 97 
2014 - 152 
2015 - 104 
2016 - 151 
2017 - 148 
2018 - 118 
2019 - 136 

अशी घ्या काळजी 
* उन्हाळ्यात गॅस सिलिंडर थंडावा असलेल्या ठिकाणी ठेवा 
* झोपण्यापूर्वी रेग्युलेटर बंद करून ठेवा 
* रेग्यूलेटरला अडकविलेले पांढरे झाकण लावा 
* गॅसचा वास आल्यास काडेपेटी, रेग्युलेटर पेटवू नका 
* पंखे, बल्ब किंवा कोणतीही इलेक्‍ट्रॉनिक वस्तू सुरू अथवा बंद करू नका 
* दरवाजे, खिडक्‍या उघडून गॅसचा वास घालवा 
* गॅसचा वास जाईपर्यंत घरात जाऊ नका 
* गॅसने पेट घेतल्यास भिजवलेली चादर, टॉवेल सिलिंडरभोवती गुंडाळा 
* गॅसगळती झाल्यास सिलिंडर घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत ठेवा 
* तत्काळ अग्निशामक दलास खबर द्या 

पावसाळा किंवा हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात अधिक उष्णता असते. त्याचा परिणाम गॅस सिलिंडरवर होतो. त्यामुळे सिलिंडरचे झाकण किंवा पाइपमधून गॅस बाहेर पडतो. त्याचवेळी आपल्याकडून गॅस सुरू करणे किंवा विजेची बटणे सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आग लागते. 
-प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशामक अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT