wearing mask during jogging is harmful for health 
पुणे

सावधान, जॉगिंग करताना मास्क वापरताय? तुमचा जीवही जाऊ शकतो!

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 9 ः सकाळी जॉगिंगला जाताय, वॉकिंग करताय.... मग मास्क वापरू नका... असे सांगत आहेत वैद्यकीय तज्ज्ञ. कारण हे व्यायामप्रकार करताना मास्क वापरला तर, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या बाबतची काळजी घ्याच, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात केंद्र सरकारने नागरिकांना सकाळी जॉगिंगला बाहेर पडण्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी व्यायाम प्रकार करण्यास बंदी घातली होती. या नियमात 3 जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातही 4 जूनपासून सकाळी सहा ते आठ आणि सायंकाळी पाच ते सात दरम्यान उद्याने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सकाळी जॉगिंग, वॉकिंगलाही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महापालिकेने मुभा दिली आहे. 

महापालिकेने परवानगी दिल्यावर नागरिकांनी रस्त्यावर सकाळी जॉगिंग, वॉकिंग सुरू केले आहे. मात्र, नागरिक सर्रास मास्क वापरून व्यायाम प्रकार करीत आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दहा वर्षांखालील मुले आणि गरोदर महिला यांनी व्यायामासाठी घराबाहेर पडू नयेत, असे केंद्र आणि राज्य सरकारचे स्पष्ट आहेत. त्याचे पालन केलेच पाहिजे. तसेच धीम्या गतीने चालत असाल तर, मास्क लावू शकता. परंतु, जॉगिंग आणि फास्ट वॉकिंग केले तर दम लागू शकतो. अशा परिस्थितीत मास्क लावू नये. कारण दम लागल्यावर प्राणवायू वेगाने घेतला जातो. त्यात अडथळा आला तर, त्या व्यक्तिला चक्कर येऊ शकते किंवा ती बेशुद्ध पडू शकते. जागिंग, वॉकींगसाठी खुल्या मैदानात जाताना मास्क लावा. परंतु, प्रत्यक्षात व्यायाम प्रकार करताना तो काढून ठेवा, असेही त्यांनी सांगितले. अन्य व्यायाम प्रकार करतानाही मास्क लावू नका, असे आवाहनही त्यांनी केले.     

फिजिशिअन डॉ. शिशिर जोशी म्हणाले, कोणताही व्यायाम प्रकार करताना मास्क वापरू नये. कारण व्यायाम सुरू असताना एअर हंगर (श्वास घेण्याची गरज) वाढते. मास्क लावला तर, श्वास अपुरा पडू शकतो. त्यामुळे जॉगिंग, वॉकिंग अथवा कोणताही व्यायाम प्रकार असो, मास्क लावू नये. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या बाबत काळजी घ्यावी. कारण व्यायाम प्रकार करताना मास्क लावला तर, फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमता कमी पडू शकते. आरोग्यासाठी ते चांगले नाही.

मात्र, ग्रूपमध्ये गप्पा मारत असाल तर, मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच गप्पा मारतानाही सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे व्यायाम प्रकार करताना मास्क वापरू नका, असेही त्यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT