Municipal Commissioner Vikram Kumar Sakal
पुणे

Metro Work : उपाययोजना करा अन्यथा मेट्रोचे काम बंद करू - आयुक्त विक्रम कुमार

पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांसाठी नियमावली केलेली असली तरी याकडे महामेट्रोतर्फे दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांसाठी नियमावली केलेली असली तरी याकडे महामेट्रोतर्फे दुर्लक्ष केले जात आहे. स्वारगेट येथील मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी व रेडिमिक्स प्लांटच्या भोवती दोन दिवसात पत्रे व हिरवे कापड लावावे. अन्यथा काम बंद केले जाईल. अशा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला आहे.

मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून, त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यानंतर केंद्र सरकारने सर्वच राज्य सरकारांना हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना नियमावली घालून दिलेली आहे. त्यानुसार राज्य शासनाने महापालिकेला ही नियमावली पाठवून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वारगेट येथील जेधे चौकात मेट्रो हब व बहुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या चौकात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषण होत असते. मेट्रो हबच्या ठिकाणी बांधकामासाठीचा आरएमसी प्लांटही असून खडी, सिमेंट वाहून आणणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. पण या ठिकाणी काम करताना मेट्रोकडून नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार आली आहे. त्यामुळे विक्रम कुमार यांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन दिवसात या हबच्या सर्व बाजूने पत्रे मारावेत व हिरवी जाळी लावावी, अन्यथा काम बंद केले जाईल, असा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT