Vaidu community sakal
पुणे

सुया घ्या, बिबा घ्या, दाभण घ्या बाई! वैदू समाजाची भटकंती सुरूच

वैदू समाजाची व्यथा, सरकारने मदत करण्याची मागणी

जयराम सुपेकर

सुपे : तुंबडी काढणार..., डबे, चाळाण करणार..., सुया घ्या..., बिब्बा घ्या..., दाभण घ्या... बाईईई... अशी आरोळी आता ऐकायला येत नाही. पुर्वीपासून दारोदार भटकणाऱ्या वैदू समाजाने कालपरत्वे व्यवसाय बदलला असला तरी त्यांची भटकंती मात्र अद्याप चालू आहे. जगण्यासाठी सरकारने कर्ज स्वरूपात मदत द्यावी. अशी या समाजातील कुटुंबाची मागणी आहे.

सुपे (ता.बारामती) येथे वैदू समाजाचे अनेक कुटुंब मुलाबाळांसह उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत. जागा मिळेल तिथे पाल ठोकून राहतात. परिसरातील गावोगाव जाऊन रोजच्या वापरातील वस्तु विकून कुटुंबाचा गाडा चालवत आहेत. पुर्वी हा समाज तुंबडी काढणे व झाडपाल्याची औषधे देत होती.

कोणी डबे, चाळण तयार करून देत होते. हा व्यवसाय बंद झाल्याने या समाजाने भंगार गोळा करणे, गॅस, कुकर, मिक्सर दुरूस्ती करून देणे, केसावर भांडी विकणे, आरसा, फणी, कंगवे, बांगड्या विकणे असे व्यवसाय सुरू केले असले तरी त्यांची भटकंती अद्याप चालूच आहे.

भटकंतीमुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ, धंदा झाला नाही तर होणारी उपासमार, उन, वारा, पावसात प्रतिकुल परिस्थितीत जागा मिळेल तिथे राहणे अशा रोजच्या समस्याविषयी या समाजाचे तरूण जितेश शिंदे, सचिन शिंदे, अमोल शिंदे सांगत होते.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी हे त्यांचे मुळ गाव. जत्रा-यात्रेच्या निमित्ताने गावाकडे जाणे होते. गावाकडे राहण्यापुरते घर आहे. शेतीवाडी नाही. आधीची पिढी अशिक्षीत आहे. आमच्या पिढीने शालेय शिक्षण घेतले आहे. पुढच्या पिढीला शिकवायचे आहे. बँकांकडून आम्हाला कर्ज मिळत नाही.

कोरोनाच्या महासाथीमुळे गेल्या दीड-दोन वर्षापासून आमचे धंदे होत नाहीत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आमच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, मदत केली नाही. महिला सुद्धा दारोदार जाऊन छोट्या वस्तु विकतात. पूर्वी त्यांच्या डोक्यावर गाठोडे होते आता टोपली आहे. आता खेड्यातही रोजच्या वापरातील वस्तु मिळत असल्याने आमच्याकडून फारसे कोणी घेत नाही.

लॉकडाऊनमध्ये तर एका ढाब्यावर भांडी घासण्याची कामे करावी लागली. सरकारने आम्हाला कर्ज दिले तर छोटे दुकान टाकून व्यवसाय करता येईल. शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या पालन करता येईल. सध्या रोजच्या धंद्यातून मिळते ते खायलाच पुरत नाही. मग आम्ही जगायचे कसे. अशी व्यथा या तरूणांसह बाईसाप शिंदे, दुर्गा शिंदे यांनी मांडली.

ओम अमोल शिंदे सातवीला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांनी जुना मोबाईल घेऊन दिला आहे. पण रोज मोबाईल रिचार्ज कुठे करायचा प्रश्न पडतो. तर अनेकदा रेंज नसल्याने अभ्यास होत नसल्याचे त्याने सांगितले. दुर्गा तायाप्पा शिंदे हे ज्येष्ठ गृहस्त म्हणाले की, मी डबे, चाळण तयार करतो. आता हे धंदे राहिले नाहीत. कोरोनामुळे खूप हाल झाले. कोणी भाकरी सुद्धा दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT