Pune Police  sakal
पुणे

Pune Police : चालकांकडून पैसे घेतल्यास गुन्हा;चिरीमिरी उकळणाऱ्या पोलिसांना अमितेश कुमार यांचा इशारा

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. वाहतूक पोलिस वाहनचालकांकडून पैसे घेताना आढळल्यास त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. वाहतूक पोलिस वाहनचालकांकडून पैसे घेताना आढळल्यास त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिस गाड्या उचलण्यामध्ये किंवा चालकांना अडवून दंड वसुल करण्यामध्ये व्यग्र असतात. चार-पाच जण एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते.

त्यावेळी पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशांची मागणी केली जाते. काही रक्कम घेऊन त्यांना सोडून दिले जाते. अशा प्रकारे चिरीमिरी घेण्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत. या घटनांची गंभीर दखल घेऊन कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

पोलिसांची नेमणूक

वाहनचालकांकडून पैसे घेणारे पोलिस शोधण्यासाठी पोलिस आयुक्तांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे पोलिस साध्या वेशामध्ये वाहनचालक म्हणून फिरणार आहेत. पोलिस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का, त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का, याची पाहणी केली जाणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT