पुणे

वेल्हे : आठ हजाराची लाच घेताना तलाठी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : वेल्हे तालुक्यातील दामगुडा असनी येथे खरेदी केलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच मागणारया कोदवडी ता.भोर येथील तलाठी मुकुंद त्रिंबकराव चिरके (वय 34) यास लाचलुचपत विभागाने आठ हजाराची लाच स्विकारताना नसरापूर येथे रंगेहाथ पकडले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथील ब्रम्हमुहुर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योगगुरु दिपक शिळीमकर यांनी संस्थेच्या ज्ञानसाधना (मेडीटेशन) हाँलसाठी वेल्हे तालुक्यातील दामगुडा असनी येथे 20 गुंठे जागा खरेदी केली असून, या खरेदीखताची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी त्यांनी या गावचे तलाठी मुकुंद चिरके यांच्याकडे पाठपुरावा करत होते. मात्र चिरके यांनी दहा हजार रुपये दिले तरच नोंद होईल असे सांगून दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी तडजोड होऊन आठ हजार रुपये द्यायचे ठरवण्यात आले होते. या बाबत शिळीमकर यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीबाबत खातरजमा झाल्यावर लाचलुचपत विभागाने आज (ता. 16 जुन) रोजी सकाळी नसरापूर चेलाडी येथील उड्डाणपुलाजवळ सापळा रचला होता.

शिळीमकर यांनी तलाठी चिरके यास त्या ठिकाणी बोलावून त्यांना लाचेचे आठ हजार रुपये दिले. त्याच वेळी लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सुनिल बिले, कर्मचारी वैभव गोसावी, रतेश थरकार, भुषण ठाकुर, चालक जाधव यांनी चिरके यास रंगेहाथ पकडले. चिरके याच्या कार्यपध्दतीबाबत कोदवडी परिसरात मोठी नाराजी असून, लाचेचे पैसे कमी असतील तर अंगावर फेकुन देऊन येवढ्यात काम होणार नाही अशी अरेरावीची कृती व वक्तव्य देखिल त्याच्याकडून होत असल्याची माहिती येथील नागरीकांनी दिली. तलाठी चिरके याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सुनिल बिले करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT