Talathi Exam Sakal
पुणे

Talathi Exam : तलाठी परिक्षेला अवघ्या 60 सेकंदाच्या उशिरामुळे नाकारला प्रवेश! पुण्यातील प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

आमदार रोहित पवार यांचा फोनसुद्धा कर्मचाऱ्यांनी घेतला नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दत्ता लवांडे

पुणे : तलाठी भरती परिक्षेसाठी आलेल्या उमेदवाराला येण्यास अवघा एक मिनीट उशीर झाल्यामुळे पुण्यातील रामटेकडी येथील परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी ९ वाजता परिक्षा सुरू होणार असल्याने ८ वाजून ४५ मिनिटापर्यंत परीक्षार्थींनी येणे अपेक्षित होते पण ९ वाजून ४६ मिनिटांनी आलेल्या परीक्षार्थींना गेटवरच अडवून ठेवल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अधिक माहितीनुसार, रामटेकडी येथील सहयोग डिजिटल हब (खाजगी परीक्षा केंद्र) येथे आज सकाळी तलाठी परीक्षेला आलेल्या परीक्षार्थींना फक्त १ ते २ मिनिटे उशिरा झाल्यामुळे त्यांना सहयोग डिजिटल हब च्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश देण्यास मज्जाव केला. परीक्षार्थी अक्षरशः विनवणी करत होते, रडत होते परंतू त्यांना परीक्षेस बसू दिले नाही.

याच दरम्यान परीक्षार्थ्यांनी आमदार रोहित पवार यांना संपर्क केला व आपले गऱ्हाणे मांडले. तरीही कर्मचाऱ्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले. शिवाय आमदार रोहित पवारांचा फोन देखील घेतला नाही. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT