पुणे

'तिसऱ्या मुंबई'चा तळेगाव हा केंद्रबिंदू : गिरीष बापट

सकाळवृत्तसेवा

पुणे : भविष्यात तिसरी मुंबई होणार असेल; तर तळेगाव हा विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे सांगितले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते आदी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, "ग्रामीण भागाच्या विकासासाठी पीएमआरडीए आहे. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पीएमआरडीएच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. एमआयडीसीला जोडणारे सर्वात तीन मोठ्या रस्त्याची कामे हाती घेतली जाणार आहेत.'' 
"पुणे व पिंपरी-चिंचवडचा मोठ्या प्रमाणात विकास होत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पीएमआरडीएची स्थापना झाली आहे. मावळ व खेड तालुक्‍यांसाठी बांधकाम परवानगी व झोन दाखला, अनधिकृत बांधकाम तक्रारी निवारण आदी कामांसाठी नागरिकांना पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात जावे लागणार नाही. सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतींसोबत राहून पीएमआरडीए काम करेल,'' असे गित्ते यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर; खोरी जलसिंचन प्रकल्पाचीही करणार पाहणी

Andheri Fire: मुंबईतील उंच इमारतीत आगीचा थरार! १७व्या मजल्यावरील घराला भीषण आग, एकाचा दुर्दैवी मृत्यू

डोक्यावर ग्लास ठेवून माधुरी दीक्षितचा बॉबी देओलसारखा डान्स! 'जमाल कुडु'च्या तालावर थिरकली धकधक गर्ल, Video Viral

Latest Marathi News Live Update: E 20 ला मंजुरी देण्याचा केंद्राचा निर्णय वैज्ञानिक पुरावे आणि तांत्रिक मूल्यांकनांवर आधारित- सुरेश गोपी

Sugarcane Workers: ऐन दिवाळीतही ऊसतोड मजुरांच्या हातात कोयता; पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून कष्ट

SCROLL FOR NEXT