pune sakal
पुणे

Pune : तळेगाव-चाकण महामार्गावर रविवारी ठिय्या आंदोलन

महामार्ग कृती समितीकडून शोकसभेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावरील जटील वाहतूक समस्या आणि रखडलेल्या रस्ते कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ तसेच वाहतूक नियंत्रण शाखेकडून अवजड वाहन प्रवेशबंदीची होत असलेली पायमल्ली थांबवण्यासाठी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीकडून आज रविवारी सकाळी १० वाजता तळेगाव स्टेशनच्या मराठा क्रांती चौकात ठिय्या आंदोलन आणि आणि शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे,उपाध्यक्ष दिलीप डोळस,सचिव अमित प्रभावळकर यांनी जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तळेगाव-चाकण महामार्गाची दुरावस्था,अपघात,वाहतुुक कोंडी आणि अवजड वाहन प्रवेशबंदीच्या अंमलबजावणीबाबत निवेदन दिले आहे.तळेगावातील अवजड वाहन प्रवेश बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी.अथवा पर्यायी मार्ग म्हणून सर्व अवजड वाहतूक तळेगाव एमआयडीसी मार्गे चाकणकडे वळवावी.

अवजड वाहन प्रवेशबंदी धाब्यावर बसवून चिरीमिरी घेऊन वाहने सोडून,अपघातांत कारणीभुत तळेगाव वाहतूक विभाग आणि वडगाव मावळ वाहतुक नियंत्रण शाखेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

अस्तित्वातील तळेगाव-चााकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करुन,सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु करावे आदी मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करणारे फलक कृती समितीकडून वडगाव फाटा,स्टेशन चौक,मराठा क्रांती चौकासह ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

जनसेवा विकास समिती,अण्णा हजारे प्रणीत राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी न्यास,जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था,जनसेवा विकास प्रतिष्ठान तळेगांव दाभाडे,तळेगांव दाभाडे शहर रिक्षा संघ,जायंट्स ग्रुप ऑफ तळेगांव दाभाडे आदींनी या आंदोलनास आपला पाठींबा जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT