पुणे

तळेगावात प्रसूतीदरम्यान माता-बालकाचा मृत्यू

CD

तळेगाव स्टेशन, ता. १९ : ‘मायमर’ संचलित तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ३८ वर्षीय महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री (ता.१८) घडली. दरम्यान, या दोघांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

रुपाली सोमनाथ इंदलकर (वय ३८, रा. कुसगाव, लोणावळा) असे मृत महिलेचे नाव आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने हा अनर्थ घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. घटनेची माहिती मिळताच आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. तसेच ‘‘आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून ‘ओपन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात येईल,’’ असे आश्वासन दिले.

वैद्यकीय अधीक्षकांचा दावा
‘‘संबंधित महिला थायरॉइड आणि उच्च रक्तदाबामुळे गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. उपचारादरम्यान हृदयविकाराचा त्रास झाला. त्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया केली. मात्र, मातेला वाचवता आले नाही. ‘एनआयसीयू’ बेड उपलब्ध नसल्याने बाळाचाही मृत्यू झाला. यात डॉक्टरांचा हलगर्जीपणा झालेला नाही,’’ असा दावा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

Shirur Crime : बेकायदेशीरपणे भिशी, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष; वीस कोटींहून अधिक रकमेचा अपहार, तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

PM Modi cabinet: मोदींनी सर्वांनाच मागे टाकलं! मंत्रिमंडळ बैठकीत तपासलं मंत्र्यांचं डिजिटल रिपोर्ट कार्ड; 'सोशल मीडिया'वर विशेष लक्ष

आता सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार! ‘या’ वेबसाईटवर करावा लागणार अर्ज; ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी लागणार नाही ‘एफआयआर’, वाचा...

SCROLL FOR NEXT