sachin ahir
sachin ahir Sakal
पुणे

तळजाईची जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही - सचिन अहीर

प्रशांत पाटील

पुणे - ‘पर्यावरण विषयांमध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे संवेदनशील आहेत. तळजाई टेकडी हे पुण्याचे फुफ्फुस असल्यामुळे आदित्यजी पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील,’ असा विश्‍वास शिवसेनेचे पुणे शहराचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी येथे व्यक्त केला.

तळजाई प्रकल्पाविषयी ‘माय अर्थ फाउंडेशन’चे अध्यक्ष अनंत घरत व शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या माध्यमातून पुण्यातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी माजी राज्यमंत्री व शिवसेना उपनेते सचिन अहीर यांची भेट घेतली. यावेळी बायोशेफर्स संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, एन्व्हार्यमेंट क्लब ऑफ इंडियाचे ललित राठी, वैशाली पाटकर, रवींद्र सिन्हा, सहकारनगर नागरी मंचाचे अमित अभ्यंकर, पुष्कर कुलकर्णी, सत्या सॅक्सस, रोहित भिसे आदी उपस्थित होते.

अहीर म्हणाले, ‘‘शहरांचा विकास करताना निसर्गांमधील विविध घटकांचा समतोल राखणे गरजेचे आहे. शाश्‍वत पर्यावरण संवर्धनासाठी एक चळवळ उभी राहणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता त्याची काळजी घेण्यास शिवसेना तयार आहे.’’

तळजाई वसुंधरा जैवविविधता प्रकल्प या गोंडस नावाखाली जो निसर्गाचा ऱ्हास होणार आहे, तो थांबविण्यासाठी माय अर्थ फाउंडेशन सध्या लोकांमध्ये प्रबोधन करण्यासह रस्त्यावरची लढाई लढत आहे. प्रकल्प रद्द करण्यासाठी सध्या आम्ही प्रशासकीय पातळीवर विरोध करत असून, वेळप्रसंगी विविध न्यायालयीन प्रक्रियांना आम्ही सामोरे जाणार आहोत, असे घरत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT