पुणे

तांबडेमळा येथे साकारणार २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय

CD

मंचर, ता. २५ : आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे १०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून २०० खाटांचे अद्ययावत सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बुधवारी (ता. २४) या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नव्या रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी आदींच्या एकूण २५९ पदांना मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांना ससून व औंध रुग्णालयांच्या धर्तीवर अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
सध्या मंचर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून, येथे दररोज सरासरी ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी नोंदणी करतात. मोफत सीटी स्कॅनसह विविध आरोग्य सेवा येथे उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने तांबडेमळा येथे नव्या सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पदांना शासनाने मान्यता दिल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या सामान्य रुग्णालयात हाड, त्वचा, कान-नाक-घसा, नेत्र, मनोविकार, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदी विविध विभागांसाठी ४९ डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर परिचारिका, परिसेविका, रक्तपेढी तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक, लघुटंकलेखक, कक्षसेवक, औषध निर्माता आदी पदांचाही समावेश आहे, अशी माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांनी दिली.

तांबडेमळा येथील सामान्य रुग्णालय सुरू झाल्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर महिला उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
- डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT