पुणे

विजय यांच्या सरकारकडून खरेदीसाठी निविदा जारी; ८१२ कोटी रुपयांची तरतूद

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
चेन्नई, ता. ६ : नवजात बालकांना प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्याची ‘थाईमामन थंगा मोथिरम थिट्टम’ (मामाकडून सोन्याची अंगठी योजना) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्यानंतर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकार आता पात्र वधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी भेट देणारी ‘अण्णन सीर’ (भावाकडून भेट) योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय यांनी दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी टीव्हीके सरकारने गेल्या महिन्यात शासन निर्णय जारी करून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ८१२ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
दोन दिवसांपूर्वी विजय सरकारने पहिल्या टप्प्यात यंदाच्या आर्थिक वर्षात पात्र वधूंना वाटप करण्यासाठी प्रत्येकी आठ ग्रॅम वजनाची ६० हजार सोन्याची नाणी आणि ६० हजार रेशमी साड्या खरेदी करण्यासाठी निविदा जारी केल्या. या निविदांमध्ये सोन्याची नाणी आणि रेशमी साड्या या दोन्हींच्या गुणवत्तेबाबत कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. सोन्याची नाणी २२ कॅरेट दर्जाची आणि ९१६ बीआयएस हॉलमार्क प्रमाणपत्र असलेली असावीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच रेशमी साड्या १०० टक्के तुतीच्या रेशमापासून आणि अर्ध्या बारीक जरीपासून विणलेल्या असाव्यात. त्यावर केंद्र सरकारचे सिल्क मार्क आणि तमिळनाडू सरकारचे हातमाग विभागाचे शिक्के असावेत, असे सरकारने म्हटले आहे.

मर्यादित लाभ
या योजनेचा लाभ फार मोठ्या संख्येने वधूंना मिळण्याची शक्यता नाही. कारण, टीव्हीकेने निवडणूक जाहीरनाम्यात वधूच्या कुटुंबासाठी वार्षिक पाच लाख रुपयांची उत्पन्नमर्यादा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने ही मर्यादा अडीच लाख रुपये निश्चित केली आहे.

टीव्हीके सरकारवर टीका

तमिळनाडूमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी, विजय यांच्याकडून अपेक्षा ठेवणाऱ्या जनतेचा भ्रमनिरास झाल्याची टीका केली. तर, खासदार कनिमोळी यांनीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत पोलिसांवर अवलंबून राहता येत नसल्याने महिलांना साड्यांऐवजी स्वसंरक्षणासाठी मिरचीच्या फवाऱ्याची साधने द्यावीत, अशी उपरोधिक मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

SCROLL FOR NEXT