Tanker
Tanker 
पुणे

टॅंकरमाफियांकडून वीजचोरी

सकाळवृत्तसेवा

पुणे - धायरी येथील मुठा उजवा कालव्यातील पाणी टॅंकरमध्ये भरण्यासाठी जो वीजजोड घेतला आहे, तो शेतीसाठीचा आहे; परंतु त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याचे महावितरणच्या भरारी पथकाला आढळले. 

एकीकडे शहरात पाणी टंचाईला पुणेकरांना तोंड द्यावे लागत असताना, दुसरीकडे कालव्यातील पाण्याची टॅंकर माफियांकडून सर्रास चोरी होत असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. धायरी परिसरात टॅंकरचालकांकडून शेतीच्या नावाखाली कालव्यातील पाण्याची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यासाठी कालव्यास भगदाड पाडून पाइपने विहिरीत पाणी आणले जाते. तेथे टॅंकरमध्ये भरून त्यांची विक्री केली जात होती.

या संदर्भातील बातम्या ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणच्या भरारी पथकाने तेथे तपासणी केली. त्या वेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

कालव्याला भगदाड पाडून त्यात पाइप टाकून ते पाणी विहिरीत आणण्यासाठी शेतीसाठीच्या वीजमीटरचा वापर होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच विहिरीतील पाणी उपसून ते टॅंकरमध्ये भरण्यासाठीदेखील त्याच मीटरमधून विजेचा वापर केला जात आहे.

हे लक्षात आल्यानंतर पथकाने किती वीजचोरी झाली असावी, यांचे मोजमाप करून संबंधितांना सुमारे एकोणीस लाख रुपयांचे वीजबिल दिले. मात्र, अद्याप संबंधितांकडून त्या वीजबिलाचा भरणा झालेला नाही. मात्र, त्यावर महावितरणकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. एकीकडे एखादे जरी बिल थकले, तरी वीजजोड तोडणारे महावितरण या प्रकरणात गप्प का, असा प्रश्‍न या निमित्ताने विचारला जात आहे.

भरारी पथकाच्या कारवाईत हे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांनी या संदर्भात किती रकमेची वीजचोरी झाली, यांचे मोजमाप करून कळविले. त्यानुसार आम्ही वीजबिल संबंधितांना पाठविले आहे. ते भरण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली आहे. संबंधितांनी वीजबिल न भरल्यास भरारी पथक त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करेल.
- अजित पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, धायरी विभाग, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT