Tankers increased Pune district monsoon Water supply to 58 villages through 41 tankers esakal
पुणे

Water Supply : पावसाळ्यात वाढले पुणे जिल्ह्यातील टँकर्स; ५८ गावांना ४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यातील तेरापैकी नऊ तालुके टँकरमुक्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकर्संची संख्या यंदा पावसाळा सुरु होताच, मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील ५८ गावे २५० वाड्यांना ४१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८९ हजार ३७३ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत आहे.

मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आज अखेरपर्यंतच्या टँकरच्या संख्या ही २५ ने कमी झाली आहे. गत वर्षी आजअखेर जिल्ह्यात ६६ टॅँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात खुपच उशिराने टँकर सुरु करावे लागले आहेत. जिल्ह्यात अगदी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ दहा टँकर सुरु झाले होते.

जून महिना हा पाऊस सुरु होण्याचा महिना असतो. त्यामुळे जूनमध्ये पाऊस पडला की, टँकर्सची संख्या कमी होत असते. परंतु यंदा याउलट चित्र पहावयास मिळू लागले आहे. जून महिना सुरु झाल्यानंतर टॅँकर्सच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा ऐन जून महिन्यात जिल्ह्यातील टँकर्सची संख्या वाढून ती आता ४१ वर गेली आहे.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यातील तेरापैकी नऊ तालुके टँकरमुक्त आहेत. उर्वरित केवळ चारच तालुक्यात हे ४१ टँकर्स सुरु आहेत. सध्या टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यांमध्ये यामध्ये आंबेगाव, जुन्नर आणि खेड या चार तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक १४ टॅंकर्स हे आंबेगाव तालुक्यात सुरु आहेत. या तालुक्यातील तेरा गावांमधील २८ हजार ३९१ लोकसंख्येला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील २३, जुन्नर तालुक्यातील १६ आणि भोर तालुक्यातील ६ गावांसाठी टँकर सुरु आहेत.

टॅंकरमुक्त नऊ तालुके

बारामती, इंदापूर, दौंड, हवेली, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार! भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, कुठे पाहाल लँडींग, जाणून घ्या

Home Remedy For Sprain: चालताना पाय मुरगळला? 'या' 5 सोप्या उपायांनी मिळवा त्वरित आराम

Wimbledon 2025: अल्काराझचे सातत्य की सिनिरचे उलटवार? आज रंगणार फायनल

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

SCROLL FOR NEXT