तन्वी कुलकर्णीची सहा गुणांसह आघाडी
महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा
पुणे, ता. ११ ः पुणे शहर विभागीय क्रीडा समिती आणी सेंट मीरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन महिला गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर सिंबायोसिस कॉलेजच्या तन्वी कुलकर्णीने सहा गुणांसह आघाडी मिळवली आहे. सहाव्या फेरीत पहिल्या पटावर तन्वी कुलकर्णीने श्रावणी म्हेत्रेला हरविले होते. मानसी टिळेकर साडेपाच गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून दुसऱ्या पटावर मानसी टिळेकरने आशी दलालला हरविले होते.
सेंट मीराज महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीरू भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे शहर विभागीय क्रीडा समितीच्या सहसचिव डॉ. अंजुश्री ऑगस्टिन, डॉ. दीपक शेंडकर, डॉ. मनीषा कोंढरे, डॉ. सुजित पवार, डॉ. पल्लवी तर्डे व मानसी पाटणकर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. एकता जाधव यांनी केले तर आभार शीतल महाडीक यांनी मानले.
सहाव्या फेरीचे काही निकाल असे ः
तन्वी कुलकर्णी (६ गुण, सिंबायोसिस कॉलेज) वि.वि. श्रावणी म्हेत्रे (४.५ गुण, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट), मानसी टिळेकर (५.५ गुण, स. प. कॉलेज) वि.वि. आशी दलाल (४ गुण, आयएलएस), आम्रपाली खर्चने (४ गुण, गरवारे कॉलेज) पराभूत विरुद्ध मयूरी बोंडगे (५ गुण, फर्ग्युसन कॉलेज), आदिती कुलकर्णी (५ गुण, कमिन्स कॉलेज) वि.वि. मृण्मयी बागवे (४ गुण, गरवारे कॉलेज), समृद्धी कुलकर्णी (४ गुण, गरवारे कॉलेज) पराभूत विरुद्ध आकांक्षा भिसे (५ गुण, फर्ग्युसन कॉलेज), शाळवी भिन्नर (४ गुण, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट) पराभूत विरुद्ध समृद्धी गाना (सावित्रीबाई फुले विद्यापीठ) (५गुण); गायत्री हीदव (३.५ गुण, एमएमएससीएलसी) पराभूत विरुद्ध वैशाली राऊताळे (५ गुण, मॉडर्न कॉलेज), वेदांती इंगळे (४.५ गुण, काशीबाई नवले कॉलेज) वि.वि. अनन्या चौरसिया (३.५ गुण, नेस वाडिया कॉलेज), वैष्णवी वाळवेकर (४.५ गुण, कमिन्स कॉलेज) वि.वि. सेजल ठाणेकर (३.५ गुण, स.प. कॉलेज), संजना सावंत (४.५ गुण, सेंट मिराज कॉलेज) वि.वि. अनुजा मरगर (३ गुण, मॉडर्न कॉलेज), पूर्वा भामरे (३ गुण, बीव्हिसीओइडब्लू) पराभूत विरुद्ध जान्हवी जैन (४ गुण, सिंबायोसिस कॉलेज), जान्हवी भोसले (४ गुण, कमिन्स कॉलेज) वि.वि. ऋचा कुलकर्णी (३ गुण, एआयएसएसएमएस), कलाश्री गरुड (३ गुण, श्री सिद्धिविनायक महाविद्यालय) पराभूत विरुद्ध साक्षी सदनशिव (४ गुण, मॉडर्न कॉलेज), मनस्वी कुंजीर (३ गुण, एआयएसएसएमएस) पराभूत विरुद्ध समीक्षा खटाळे (४ गुण, एआयएसएसएमएस), तिथी मेहता (४ गुण, एआयएसएसएमएस) वि.वि. शांभवी देशपांडे (३ गुण, सिंबायोसिस कॉलेज).
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.