पुणे

तारळे राजकीय वार्तापत्र

CD

तारळेत देसाईंचा बालेकिल्ला की भाजपचा ट्रेंड?

‘जनसंपर्क’ विरुद्ध ‘रुग्णसेवा’ अशी अटीतटीची लढाई; दिग्गज नेत्यांची रसद

यशवंतदत्त बेंद्रे ः सकाळ वृत्तसेवा

तारळे (प्रतिनिधी) : थंडीचा कडाका वाढत असतानाच पाटण तालुक्यातील तारळे गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा राजकीय ज्वर प्रचंड वाढला आहे. राज्यात युती असली, तरी तारळेच्या भूमीत मात्र भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. पाटणकर गटाला ताकद देण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिलेल्या आव्हानामुळे आणि पालकमंत्र्यांनी त्यास दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरमुळे या निवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
तारळे जिल्हा परिषद गटात दोन बलाढ्य उमेदवार आमनेसामने आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे खंदे समर्थक आणि शिवदौलत बँकेचे माजी संचालक अभिजित पाटील यांच्या पत्नी स्वप्ना पाटील यांना शिवसेनेने (शिंदे गट) रिंगणात उतरवले आहे. अभिजित पाटील यांची कार्यकर्त्यांचे संघटन आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क ही शिवसेनेची जमेची बाजू आहे. पालकमंत्र्यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसरीकडे, भाजपने डॉ. क्रांती साळुंखे यांच्या रूपाने एक उच्चशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून रुग्णसेवेच्या माध्यमातून डॉ. बबन साळुंखे आणि डॉ. क्रांती साळुंखे यांनी समाजाशी नाळ जोडली आहे. राजकीय चौकटीबाहेरील नवीन चेहरा असल्याने मतदारांची पसंती त्यांना मिळू शकते, असा भाजपचा दावा आहे. त्यामुळे ‘जनसंपर्क’ विरुद्ध ‘रुग्णसेवा’ असा हा सामना रंगतदार होणार आहे.
तारळे पंचायत समिती गणात जाधव घराण्यातील दोन दिग्गज नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेकडून माजी उपसरपंच विकास जाधव यांनी शड्डू ठोकला आहे, तर भाजपच्या चिन्हावर बाजार समितीचे उपसभापती अभिजित जाधव निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असून, घराण्यांचा राजकीय वारसा टिकवण्यासाठी दोघांनीही जोर लावला आहे. मुरुड गणात शिवसेनेकडून सविता विजय पवार रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचे पती विजय पवार यांनी निवडणूक लढवली होती, त्यावेळच्या उणिवा भरून काढून यावेळी विजय खेचून आणण्यासाठी पवार कुटुंबाने कंबर कसली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने रेखा संजय घाडगे हा नवा कोरा चेहरा देऊन उमेदवारीतील पुनरावृत्ती टाळली आहे. भाजपचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ कितपत यशस्वी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चौकट
भाजपकडून खिंडीत गाठण्याची रणनीती
तारळे विभाग हा पारंपरिकरीत्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्र्यांना येथून ५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळते. बहुतांश ग्रामपंचायती आणि सेवा सोसायट्यांवर शिवसेनेचे वर्चस्व असल्याने सध्या तरी शिवसेनेचे पारडे जड वाटते. मात्र, मागील दोन निवडणुकांत बसलेले अनपेक्षित झटके आणि सध्या भाजपमध्ये सामील झालेली मोठी तरुणाई यामुळे शिवसेनेला गाफील राहून चालणार नाही. केंद्र आणि राज्यातील सत्ता, तसेच भाजपच्या वाढत्या प्रभावाचा फायदा घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे. पाटण तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अतुल भोसले यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना बळ दिले आहे. संधी मिळेल तिथे पालकमंत्र्यांना खिंडीत गाठण्याची रणनीती आखली गेल्याने पाटणकर गट पूर्णपणे ‘चार्ज’ झाला आहे. मात्र, शंभूराज देसाई यांनीही प्रत्येक डाव परतवून लावण्यासाठी आपली चक्रव्यूह रचना तयार ठेवली आहे.

4329
रेखा घाडगे

5455
सविता पवार
...........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Congress Conflict: कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोरच "डीके, डीके"च्या घोषणा; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उघड!

RTE Admission : आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Muralidhar Mohol : पुण्यात भाजप गटनेतेची निवड दोन दिवसांत ठरणार

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत ६५ वर्षांवरील १५५३० आजीबाई अन्‌ २१ वर्षांखालील ३२८२ तरुणी; ९८ हजार महिलांची चुकली ‘ई-केवायसी’; अंगणवाडी सेविका पुन्हा घरोघरी

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT