पुणे

तारळे इस्रो सफर

CD

इस्रो सहलीत तारळे बीटचा पुन्हा दबदबा

तब्बल १० विद्यार्थ्यांची निवड; ‘आविष्कार’साठीही सहा विद्यार्थी पात्र

यशवंतदत्त बेंद्रे : सकाळ वृत्तसेवा
तारळे, ता. ५ : अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या वैज्ञानिक सहलीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या निवडीत पाटण तालुक्यातील ११ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १० विद्यार्थी तारळे बिटातील निवडले गेले आहेत. ‘आविष्कार’ अभियानांतर्गत हैदराबाद येथे आयोजित शैक्षणिक सहलीसाठी निवडलेल्या तालुक्यातील सहाही विद्यार्थी तारळे बिटातील असल्याने या बिटाचा पुन्हा एकदा शैक्षणिक दबदबा अधोरेखित झाला आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांत विज्ञानविषयी आवड निर्माण व्हावी, संशोधनवृत्ती वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने शासनातर्फे इस्रो सहल आयोजित केली जाते. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रातील संधी ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
या सहलीसाठी तारळे मुलींच्या प्राथमिक शाळेतील आरोही समाधान जाधव, संस्कृती संजय पवार, आराध्या पोपट पालवे, तारळे मुलांच्या शाळेतील विराज दगडू बोबडे, ओमप्रसाद ओंकार सिकंदर, राहुडे येथील सई भरत चव्हाण, संभाजीनगर शाळेतील आर्यन दत्तात्रय पवार, प्रतीक जितेंद्र पवार, आर्या विजय वरेकर तसेच आंबळे शाळेतील रविराज तुषार यादव यांची निवड झाली.
‘आविष्कार’ अभियानांतर्गत हैदराबाद येथे आयोजित विशेष शैक्षणिक सहलीसाठी जिल्हा परिषद शाळा तारळे (मुले) येथील संस्कार सतपाल जाधव, अर्णव विजय काकडे, अथर्व सदाशिव जाधव, तारळे मुलींच्या शाळेतील आरोही समाधान जाधव, मरळोशी शाळेतील मयुरी संतोष कदम आणि धनश्री हनुमंत कदम यांची निवड झाली.

या विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमधून केली आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, रॉकेट प्रक्षेपण यासह विविध अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. शास्त्रज्ञ व तज्ज्ञांशी संवादही साधण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून तारळे बिटाने स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, या यशामुळे त्या परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे जिल्हा परिषद सदस्या स्वप्ना पाटील, पंचायत समिती सदस्य विकास जाधव, सदस्या सविता पवार, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, नागरिकांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT