teacher 
पुणे

"आयटीआय'च्या कर्मचाऱ्यांसाठी होणार हा महत्त्वाचा निर्णय 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : राज्यातील शासकीय आयटीआयमधील तासिका कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्याबाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल. तासिका तत्त्वावरील निदेशकांवर अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट आश्‍वासन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री नवाब मलिक यांना आज (ता. 1) परभणी येथे निवेदन दिले. या वेळी झालेल्या चर्चेत मलिक यांनी वरील आश्वासन दिले. तसेच, शासकीय आयटीआयमधील तासिका तत्त्वावरील अनुभवी शिक्षकांचे भवितव्य धोक्‍यात आल्याबाबतचे वृत्त "सकाळ'च्या 22 एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेण्यात आली असल्याची भावना संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीचे सरचिटणीस उपेंद्र लोखंडे, सदस्य अफरोज अब्दुल हन्नन शेख व इतर उपस्थित होते. 

या वेळी, 700 पदांची भरती होण्यापूर्वी तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात यावे, तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येऊ शकते, या विषयावर समितीच्या वतीने सखोल चर्चा करण्यात आली. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT